डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले -भाजप जेष्ठ नेते, अशोकराव चोरमले

0
61

पाथर्डी (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

 अखंड भारताचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविण्यासाठी झटणारे तसेच काश्मीरसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील ३७० वे कलम रद्द करून पुर्ण केले असे प्रतिपादन जेष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले यांनी केले. 

भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या शहरातील व्हाईट हाऊस या जनसंपर्क कार्यालयात जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृति दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, नगरसेवक अनिल बोरूडे, बबन बुचकुल, माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, नगरसेविका मंगल कोकाटे, वृध्देश्वरचे संचालक बाळासाहेब गोल्हार, नारायण पालवे आदि उपस्थित होते

भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्यासह अनेक वक्त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.