Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रED Raids Anil Deshmukh House: ED Raid in Anil Deshmukh House In...

ED Raids Anil Deshmukh House: ED Raid in Anil Deshmukh House In Nagpur – मोठी घडामोड! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे | Maharashtra Times


हायलाइट्स:

  • सक्तवसुली संचालनालयाची नागपुरात मोठी कारवाई
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापे
  • देशमुख यांच्या निकटवर्तीयांवरही कारवाई

नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (ED Raid at Anil Deshmukh House)

खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. त्यात सीआरपीएफच्या महिला बटालियनचाही समावेश होता. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.

Nagpur

वाचा: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात

१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

वाचा: उदयनराजेंचा अवमानकारक उल्लेख; समर्थकांनी उद्योजकाला फासलं काळं

मुंबईतील घरीही छापे

नागपूरबरोबरच देशमुख यांच्या मुंबईतील घरी देखील ईडीनं छापे टाकले आहेत. वरळीतील सुखदा टॉवरमध्ये देशमुख यांचं घर आहे. तिथं ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांचा शोध घेत आहे. देशमुख यांच्या मुंबईतील घरी सध्या कोण आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

Anil-DeshmukhSource link

ED Raids Anil Deshmukh House: ED Raid in Anil Deshmukh House In Nagpur - मोठी घडामोड! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे | Maharashtra Times
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News