पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भारतीय स्वातंत्र्य संग्रमामधे जीवनाचा यज्ञ करून प्राणाची आहुति देऊन अजरामर झालेल्या क्रांतिकारकांमध्ये अग्रगण्य असणारे क्रांतिवीर संगोळी रायन्ना.
क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तुर (कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला लहानपणा पासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी होते याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटिशां सोबत लढताना झाला.
किट्टुर राज्यामध्ये राणी चेन्नम्मा शासन काळामध्ये सेनाप्रमुख म्हणून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला.
२६ जानेवारी १८३१ मध्ये स्वातंत्र्य योद्धा म्हणून इंग्रजांनी त्यांना फाशी देऊन अमर केले नंदगड बेलगाम येथे त्यांची समाधी आहे. महान योद्धा, भारतीय स्वातंत्र्य अबादित राहण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले पहिले आद्यक्रांतीवीर संगोळी रायन्ना.
शुर पराक्रमी स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना इंग्रजी सत्तेस भारतात पाय पसरु न देण्याच्या इराद्याने इंग्रजी सैन्य, फलटनी यांचेवर गनिमी काव्याने हल्ले करुन सळो की पळो करुन सोडनारे . सरकारी खजीना हस्तगत करुन जनतेत वितरीत करणे, सावकाराकडील जमिनी शेतकर्यांना मिळवून देणे, सावकारी कागदपत्रांची होळी करणे. इंग्रजी सत्तेस मुळासकट उलथुन लावण्यासाठी सामान्य जनतेतून सैन्य उभे करुन इंग्रजी सरकारला नाकी नऊ आणले.
आपल्या देशात फंदफितुरीची कीड कायमच आहे. संगोळी रायन्ना यांनाही फीतुरीनेच पकडले. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन खटला चालवला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
फाशी देण्यापुर्वी अंतिम इच्छा विचारल्यावर संगोळी रायन्ना म्हणाले, “या भारत भुमिवर परत जन्म घेणे आणि ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे ही एकच शेवटची अपेक्षा” या महान योद्ध्यास २६ जानेवारी १९३१ रोजी फाशी देणेत आली.
काय योगायोग आहे पहा…
संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ १५ ऑगस्ट १७९८ रोजी व त्यांना फाशी २६ जानेवारी १८३१ रोजी दिली गेली.
हेच दोन दिवस पुढे भारतास स्वातंत्र्य १५ रोजी झाला तर प्रजाकसत्ताक दिन २६ जानेवारीला.
या महान स्वातंत्र्यवीराच्या जयंतीच्या देशवासीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.