निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

3
97

पुणे, 07 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाक्य युद्ध पेटण्याचे चिन्ह आहे.  ‘नाथाभाऊ हे आजही नेते आहेत. निदान तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलायला पाहिजे, आम्हाला धोका झाला याचे दु:ख आहे, पण पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही’, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी खडसेंना टोला लगावला.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तरं दिली.

एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. पण,  नाथाभाऊ आजही आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर खरं बोलायला पाहिजे. राष्ट्रवादीत गेल्यापासून त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलनं केली. पंढरपूर पोटनिवडणूक सुद्धा जिंकलो. पण आम्हाला धोका झाला याचं दुःख आहेच, पण ही प्रतिक्रिया आहे. पक्षात कुणीही अस्वस्थ नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.

‘काँग्रेसचे नेते आज इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत आहे. पण अजितदादा असो की उद्धव ठाकरे यांचं सगळंच म्हणणं असतं की केंद्राने सगळंच करावं. इंधनाचे दर जागतिक स्तरावर ठरलेली असता.  केंद्र आणि राज्याने टॅक्स कमी करावा, राज्य तर काहीच करत नाही. केंद्रांवर बोला पण आधी तुम्ही टॅक्स कमी करा. फक्त केंद्राने आम्हाला हे द्या ते द्या, एवढंच सुरू आहे’, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

‘पहिली लाट ओसरल्यानंतर लसीकरण केंद्रांवर माणसं फिरत नव्हती, गैरसमज झाला होता. लस फार काळ टिकत नाही, म्हणून लस बाहेर दिली असेल. त्याची टक्केवारी आहे.  दुसऱ्या लाटेत धावाधाव झाली. पण या काळात एक्स्पोर्टसाठी काही ठरलेलं होतं, त्यामुळे लस कमी मिळाली असावी. पण मोदींनी मदत केली, जूनपर्यंत लसीकरण सुरळीत होईल. पुण्याने खाजगी लसीकरण सुरू केलं ते राज्याने करावं, असंही पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर मी काही बोलणार नाही.  माझा दिवस कशाला खराब करता. त्यांनी पुण्यात 80 नाहीतर 280 जागा लढवाव्या, त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

तसंच, आमच्या पक्षात काही मतभेद झाले असतील तर ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमच्या पक्षातून गेल्यावर आम्ही त्याला मारत नाही. आम्ही समजावून सांगतो, शुभेच्छा देतो, दिल्या घरी सुखी राहा, असंही पाटील म्हणाले.


Source link