Thursday, June 17, 2021
Homeमनोरंजननेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत...

नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?

शासननामा न्यूज ऑनलाईन

नेहा कक्कर (neha kakkar) म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत आहे. तिच्या सुरेल आवाजामुळे तिने प्रसिद्धी मिळवली आहेच, पण सध्या काही काळापासून एक फॅशन आणि ब्युटी आयकॉन म्हणून देखील नेहा पुढे येत आहे. तुम्हाला माहित असेल तर नेहा एका सामान्य कुटुंबातून पुढे आली आहे. सिंगिंग शो मधून तिचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. त्या आधी एका सामान्य तरुणीप्रमाणे ती आयुष्य जगात होती. पण जेव्हा तिच्या आयुष्याला तिच्याच आवाजाने कलाटणी मिळाली आणि नेहा कक्कर स्टार झाली तेव्हापासून तिचं सगळं आयुष्य तर बदललंच पण तिचं रूप देखील बदललं.

नेहा पूर्वी आपल्या चेहऱ्यावरील मुरुमांनी खूप त्रस्त होती, पण आता स्टार असल्याने ती याकडे दुर्लक्ष करून त्या सोबत जगू शकत नव्हती. म्हणून तिने आपल्या या समस्येवर एक जालीम उपाय शोधून काढला आणि आज ती सुंदर आणि स्वच्छ त्वचेसह एक ब्युटी आयकॉन म्हणून जगापुढे येत आहे. आज आपण जाणून घेऊया असा काय तो उपाय ज्यामुळे नेहाच्या त्वचेला नवचैतन्य मिळाले.

स्कीनसाठी नेहाचे आवडते तेल

नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?

नेहा कक्करने आपल्या स्कीन केअर रेजिम बद्दल बोलताना सांगितले की, “जर तुम्ही मला माझ्या त्वचेचे रहस्य विचाराल तर मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे टी ट्री इसेन्शियल ऑईल होय. हे असे ऑईल आहे ज्याशिवाय मी राहू शकत नाही. या ऑईल वर माझा खुप विश्वास आहे.” नेहाने पुढेही असेही सांगितले की, “इसेन्शियल ऑईल हे त्वचेसाठी खूप लाभदायक असते आणि मी स्वत:हून त्याचा अनुभव घेतला आहे. त्वचा आणि सौंदर्य यांच्याशी निगडीत अनेक समस्यांवर केवळ हे एकच तेल तुम्हाला खूप प्रभावी ठरू शकतं. जसे की मुरूम, त्वचेमध्ये जळजळ, खाज इत्यादी.”

असा करावा त्वचेवर वापर

नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?

या तेलाचा वापर तुम्ही करणार असला तर तुम्हाला एक गोष्ट माहित असायला हवी की इसेन्शियल ऑईलचा वापर थेट त्वचेवर करू नये. दुसऱ्या एखाद्या ऑईल सोबत मिक्स करूनच इसेन्शियल ऑईलचा वापर करावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या ऑईल मध्ये मिक्स करताना इसेन्शियल ऑईलची मात्र खूप कमी असायला हवी. कारण हे तेल खूप प्रभावी असते आणि त्वचेवर लगेच परिणाम करते. म्हणूनच त्वचेवरील डाग, मुरूम, स्कीन इरिटेशन यासारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी इसेन्शियल ऑईल फायदेशीर आहे.

मुरुमांचे डाग दूर करून सुंदर त्वचा मिळवण्यासाठी

नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?

तुमची स्कीन कशीही का असेना म्हणजे ऑईली, ड्राय वा सेंसिटिव्ह, तुम्ही तुमच्या त्वचेवर इसेन्शियल ऑईलचा वापर करून त्वचेची सुंदरता वाढवू शकता. एका गोष्टीची काळजी दरवेळी घ्यावी की दुसऱ्या ऑईल सोबत मिक्स करताना इसेन्शियल ऑईलची मात्रा योग्यच असायला हवी. आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही ते मिक्स करू शकता. 1 चमचा नारळ व बदाम तेल घ्या. या तेलामध्ये केवळ 2 किंवा 3 थेंब इसेन्शियल ऑईल घाला. तुम्हाल हवे असल्यास नारळ तेल, बदाम तेल एकत्र मिक्स करून तुम्ही ऑईल बनवू शकता आणि त्यात 2 ते 3 थेंब इसेन्शियल ऑईल टाकू शकता. हे मिश्रण चेहरा, मान आणि पूर्ण शरीरावर लावले तरी चालते.

असा होतो फायदा

नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?

इसेन्शियल ऑईलचे मिश्रण तयार करण्यापूर्वी आपला चेहरा फेसवॉश करा किंवा गुलाबजल स्प्रेने क्लीन करून घ्या. यानंतर तयार झाले मिश्रण स्कीनवर लावा. असे केल्याने तुमच्या स्कीनचा ग्लो लवकर वाढेल. कारण फेसवॉश नंतर त्वचा खूप मऊ होते आणि पोर्स ओपन होते. अशा वेळी हे मिश्रण स्कीनमध्ये लवकर सामावले जाते आणि तुमच्या त्वचेवर लगेच परिणाम देखील दिसून येतो. म्हणूनच सौंदर्य शास्त्रामध्ये इसेन्शियल ऑईलला महत्त्व आहे.

केवळ 2 वेळा लावावे

-2-

इसेन्शियल ऑईलचे हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर दिवसातून दोन वेळेपेक्षा जास्त वेळ लावू नका. तुम्ही जर रात्री झोपण्याआधी हे मिश्रण लावले तर अधिक उत्तम फायदा होईल. जेणेकरून रात्रभर हे तुमच्या स्कीन वर काम करेल आणि तुमची त्वचा निरोगी होण्यास मदत करेल. यामुळे त्वचेवरील डाग आणि पुरळ लवकर जाऊन त्वचा सुंदर आणि आकर्षक दिसू लागेल. तर मंडळी इसेन्शियल ऑईलचे हे फायदे पाहता तुम्ही नक्की या तेलाचा वापर करून पहा आणि नेहा कक्कर सारखी सुंदर व स्वच्छ त्वचा मिळवा.

हे घरगुती पदार्थ करतील मुरुमांची समस्या चुटकीसरशी दूर!

हे घरगुती पदार्थ करतील मुरुमांची समस्या चुटकीसरशी दूर

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW