Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाEuro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात...

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल | In UEFA EURO 2020 Semi Final Italy Defeated Spain in Penalty Shootout and Reached in Finalइटलीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सेमीफायनलमध्ये स्पेनला मात दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवत इटलीने अंतिम सामन्याचा तिकीट मिळवलं.

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल

इटली आणि स्पेन यांच्यातील पेनल्टी शूटआऊट

लंडन : जगातील मानाच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये अमेरिकन देशांमध्ये कोपा अमेरिका कप आणि युरोपियन देशात युरो कप या स्पर्धांकडे पाहिलं जातं. यात कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझील दाखल झाला आहे. तर दुसरीकडे युरो चषक स्पर्धेचाही (UEFA Euro 2020) पहिला अंतिम सामन्यात खेळणारा संघ समोर आला असून इटलीने सेमीफायनलमध्ये स्पेनला  (Italy vs Spain) मात देत अंतिम सामना गाठला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल केला. त्यामुळे विजयी कोण हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले, ज्यात इटलीने 4-2 च्या फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. (In UEFA EURO 2020 Semi Final Italy Defeated Spain in Penalty Shootout and Reached in Final)

लंडनच्या ऐतिहासिक वेम्बली स्टेडियममध्ये इचली आणि स्पेन यांच्यातील सामना पार पडला. जवळपास 58,000 प्रेक्षकांच्या उपस्थित पार पडलेल्या या सामन्यात मैदानात अगदी उत्साही वातावरण होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासून इटलीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली होती. पण सेमीफायनलचा सामना अत्यंत चुरशीचा झाला ज्यात इटली आणि स्पेन दोन्ही संघानी संपूर्ण सामना संपला तरी 1-1 च गोल केला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटने विजेता घोषित करण्यात आला.

इटलीचा पहिला वार

सामन्यात आमने-सामने असलेले दोन्ही संघ तगडे असल्याने सुरुवातीपासून सामना चुरशीचा सुरु होता. त्यामुळे बराच वेळ दोनही संघाना एकही गोल करता येत नव्हता. पहिल्या हाल्फपर्यंततर दोन्ही संघाचा स्कोर 0-0 होता. मात्र दुसरा हाल्फ सुरु होताच 60 व्या मिनिटाला इटलीने पहिला गोल दागला.  इटलीचा स्ट्रायकर चीरो इममोबिले (Ciro Immobile) याला गोलपोस्टजवळ स्पॅनिश डिफेंडरने टॅकल केलं आणि बॉल थेट इटलीच्या फेडरिको किएजाकडे (Federico Chiesa) गेला. त्याने तो गोलपोस्टमध्ये टाकत पहिला गोल केला.

मोराटाने साधली बरोबरी

सामन्यात एका तासानंतर पहिला गोल करत इटलीने 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर स्पेनकडून ही प्रयत्नांची शिकस्त करण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर 80 व्या मिनिटाला स्पेनचा सध्याचा अव्वल खेळाडू स्ट्रायकर अलवारो मोराटाने (Alvaro Morata) गोल करत स्पेनचा स्कोर ही 1 केला. या गोलसोबतच दोन्ही संघाचा स्कोर 1-1 झाल्याने सामन्यात दोन्ही संघ बरोबरीला आले. त्यानंतर 30 मिनिट अधिकचा खेळही खेळवला गेला पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने अखेर पेनल्टी शूटआऊट करण्यात आले.

पेनल्टी शूटआउटमध्ये अंतिम निर्णय

स्पेनने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वित्झरर्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत सेमीफायनल गाठली होती. तर दुसरीकडे याआधी 13 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये याच युरो कपच्या बाद फेरीत इटलीला स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत स्पर्धेबाहेर केले होते. याच पराभवाचा बदला घेच इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनला 4-2 च्या फरकाने नमवत अंतिम सामना गाठला. पेनल्टी शूटआऊट अत्यंत चूरशीच्या स्थितीत असताना 3-2 असा स्कोर होता. इटली 1 गोलने पुढे असताना स्पेनला गोल करणे अनिवार्य होते. पण याचवेळी सामन्यात इटलीचं आव्हान कायम ठेवणार्या मोराटालाच गोल करता न आल्याने स्पेन 4-2 ने पराभूत झाली आणि इटलीने अंतिम सामन्याचा तिकीट मिळवलं.

हे ही वाचा :

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

(In UEFA EURO 2020 Semi Final Italy Defeated Spain in Penalty Shootout and Reached in Final)

Source link

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल | In UEFA EURO 2020 Semi Final Italy Defeated Spain in Penalty Shootout and Reached in Final
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News