व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

0
47

पुणे, 03 जुलै: पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक (Famous Art Director) राजू सापते (Raju Sapte) यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम सापते यांनी सांगितलं आहे.

वाकड पोलीस स्टेशनमध्ये राम सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Source link