क्रिकेटविश्वात हळहळ; दिग्गज कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शासननामा न्यूज ऑनलाईन

टीम इंडियाचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झालं आहे. बापू नाडकर्णी हे ८७ वर्षांचे होते. बापू नाडकर्णी त्यांच्या मुलीकडे मुंबईत हिरानंदानी गार्डन येथे राहत होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उजव्या हाताचे गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी इंग्लंड टीमविरोधात सर्वाधिक २१ ओव्हर एकही रन न काढू देता टाकल्या होत्या. तो रेकॉर्ड आजही अतूट आहे.

बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी आपल्या परिवारासह मुंबईत राहत होते. बापूंचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी झाला. ते १३ वर्षांचे असल्यापासून टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळत होते.

भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही बापूंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कसोटीत सलग २१ निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम करणारा फिरकीपटू ही बापूंची ओळख डोळ्यापुढे ठेवतच मी माझी क्रिकेटमधील वाटचाल केली, असे सचिनने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अचूक गोलंदाजी करतानाच, निर्धाव षटके टाकून समोरच्या फलंदाजाला बेजार करण्यासाठी ओळखले जाणारे बापू नाडकर्णी आज आपल्यातून निघून गेले.
महाराष्ट्रातील या महान क्रिकेटपटूला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

बीसीसीआयनेही बापूंच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बापूंनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देत नाडकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here