Sunday, July 25, 2021
Homeदेश-विदेशलशींसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश

लशींसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश

नवी दिल्ली : ज्या लसीकरणाच्या धोरणावर केंद्र सरकारवर इतके दिवस टीका होत होती, त्याच लसीकरणाबद्दल अचानक पंतप्रधानांच्या आभाराची मोहीम सुरु झाली आहे. केवळ भाजपचे नेते, मुख्यमंत्रीच नव्हेत तर अगदी देशातल्या विद्यापीठांनाही यात सामील केलं जातंय का असा प्रश्न यूजीसीच्या एका निर्देशानं निर्माण झालाय.

मोफत लसीकरणाच्या मोहीमेबद्दल पंतप्रधानांचे जाहीर आभार माना..यूजीसीनं देशातल्या विद्यापीठांना असे निर्देश दिल्यानंतर त्यावर वाद सुरु झालाय. 21 जूनपासून केंद्र सरकारनं 18 वर्षावरील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरु केलं आहे. त्याच मोहिमेबद्दल आभाराचे फलक विद्यापीठ परिसरात लावण्याची सूचना विद्यापीठाकडून करण्यात आली. पाठोपाठ दिल्ली विद्यापीठ, जम्मूतलं माता वैष्णोदेवी विद्यापीठ यांनी तर कॅम्पससोबतच सोशल माध्यमांवरही हे फलक लावून टाकले.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांच्या नावाने विद्यापीठांना हा मेसेज आल्याचं सांगितलं जातंय. साहजिकच राजकीय गोष्टींच प्रतिबिंब विद्यापीठाच्या आवारात दिसू लागल्यानं शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. विरोधी पक्षांनीही त्यावर टीका केलीय. या आदेशाबाबत यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांची अद्याप कुठली प्रतिक्रिया आलेली नाही.पण यूजीसीचा हा आदेश बंधनकारक नव्हता, विद्यापीठं आपल्या कक्षेत त्याचं पालन करायचं की नाही हे ठरवू शकतात असा बचाव यूजीसीच्या सूत्रांकडून केला जातोय.

Source link

लशींसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News