Gokul Milk: no immediate increase in price of gokul milk: ग्राहकांना दिलासा, ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही – there is no immediate increase in price of milk sales of gokul

0
56


हायलाइट्स:

  • ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही.
  • गोकुळ राज्यातील इतर दूध संघाशी दूध विक्री दर वाढीबाबत चर्चा करुन निर्णय घेणार.
  • गोकुळच्या या निर्णयामुळे दूध ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील इतर दूध संघाशी दूध विक्री दर वाढीबाबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे गोकुळ दूध संघाने ठरवल्याने दूध दरवाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे यामुळे गोकुळ दूध ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (there is no immediate increase in price of milk sales of gokul)

अमोल दूध संघाने दुधाचे दर वाढवल्यानंतर राज्यातील गोकुळसह इतर काही दूध संघानी दूध दरवाढीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून आज गोकुळ दूध संघाच्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीत दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील यांनी ग्राहकांना दिलासा दिला. इतर दूध संघाशी चर्चा करण्याचे संपूर्ण अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले. तूर्तास दूध विक्री दरात वाढ होणार नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण; पाहा, आजची ताजी स्थिती!

शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ‘वारणा, चितळे, राजारामबापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दरवाढीबाबत चर्चा
करून अंतिम निर्णय घेण्‍याविषयी सर्वांचे एकमत झाले.

क्लिक करा आणि वाचा- तिन्ही कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादीचे स्पष्ट केली अधिकृत भूमिका

याप्रसंगी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब
चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका
अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर व संघाचे इतर अधिकरी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत-आशीष शेलार यांच्या गुप्त भेटीची चर्चा; शेलार यांचा मात्र इन्कार

‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शिल्लक दूधाचा प्रश्न, पेट्रोल डिझेलच्या दरवाढ यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यासर्व बाबीचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करावी का ? याबाबत संचालक मंडळाचा बैठकीत चर्चा झाली. इतर दूध संघाशी चर्चा करुनच दूध विक्री दरात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ.’

विश्वास पाटील, चेअरमन, गोकुळ दूध संघ


क्लिक करा आणि वाचा- ‘आता कोणाशीही चर्चा नाही, सोमवारपासून व्यापार सुरू करणारच’Source link