gopichand padalkar’s car is pelted with stones: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक – mla gopichand padalkar car is pelted with stones in solapur

0
42


हायलाइट्स:

  • आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे.
  • घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते.
  • सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती.

सोलापूर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते. सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. (mla gopichand padalkar car is pelted with stones in solapur)

सायंकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या वाहनातून घोंगडी बैठकीला आले होते.त्यावेळी त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे समजले.कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगडफेक करून काच फोडल्याचे सांगण्यात येते.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९,७७१ नव्या रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण अधिक

शरद पवारांवरील टिकेनंतर आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समजते. घटना समजताच जोडभावी पेठे पोलीस चौकीचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले.कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासोबत बंदोबस्त वाढवला आहे.दगडफेक नेमकी कोण केली की अन्य कारणामुळे गाडीची काच फुटली याचा तपास पोलीस करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेच्या महापौर खडसेंच्या भेटीला; अर्धातास बंद दाराआड चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता

पडळकरांनी केली होती शरद पवार यांच्यावर टीका

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

क्लिक करा आणि वाचा- मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलेले असतानाही राज्य सरकारने ते केले नाही, असा आरोपही पडळकर यांनी केला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे आणि याच म्हणूनच काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असेही ते म्हणाले होते.Source link