हडपसर लढाईच्या दिवसाचे औचित्य साधून महाराजा यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन – यशवंत सेनेचा उपक्रम

0
64

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

२५ऑक्टोबर १८०२ ला पुण्यात झालेल्या शिंदे व होळकर यांच्यातील दुर्दैवी लढाईत वीरमरण आलेल्या सैनिकांच्या प्रेतांचे मांस पक्षांनी गिधाडाणी खाल्ल्या मूळे हाडे पसरल्या सारखे चित्र लढाई झाली त्या परिसरात झाले त्या स्थानाला हडपसर असे नाव पडले असे या दिवसाच्या लढाईची माहिती देताना व्याख्याते सोमनाथ देवकाते यांनी सांगितले.

हडपसर लढाईच्या दिवसाचे औचित्य साधून महाराजा यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन - यशवंत सेनेचा उपक्रम

हडपसर दिनाचे औचित्य साधून यशवंत सेना प्रमुख माधव गडदे यांच्या सूचनेुसार शहराध्यक्ष संतोष शिंदे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर यांनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हडपसर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक बारकुल सर,बोटे सर, उदमले सर,जगताप सर,धूर्मारे सर यांचे सहकार्य लाभले.

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्राची नव्याने ओळख उपस्थित विद्यार्थ्याना या माध्यमातून झाली भारताचा नेपोलियन व यशवतरावांच्या पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष शिंदे तर आभार प्रदर्शन उदामले सरांनी केले