…हे सरकार जावे की राहावे श्रींची इच्छा..!!

पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पोसिबिलिटी

0
484

लेखक : प्रमोद परदेशी (प्रदेश अध्यक्ष: नमो ग्रुप फाउंडेशन, महाराष्ट्र)

पुणे । शासननामा न्यूज ऑनलाईन

महत प्रयासाने आलेले महाआघाडी सरकार कोणत्या वळणावर जात आहे याचा राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकांनी अंदाज बांधणे कठीण होत आहे “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” या म्हणीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही

हे सरकार अस्तित्वात येण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गोळाबेरीज आणि जोडतोडीच्या राजकारणात निष्णात आहेत तसेच कधी कुणाशी आघाडी होईल आणि कधी तुटेल याचाही नेम नाही आणि साहेबांच्याच मार्गदर्शनात या सरकारचे कामकाज सुरळीत सुरू आहे

सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना परतवण्यासाठी शिवसेनेसोबत राष्ट्रवादीही लढताना दिसायची पण आता पालघर मधील साधूंची हत्या, कोरोना विषाणूचा पादुर्भाव जरी जगभरात असला, तरी महाराष्ट्रात तर ह्या रोगाने देशातील उच्चांक गाठला आहे. एकूण रुग्णांपैकी ११ लाख रुग्ण महाराष्ट्रात आहेत ही चिंताजनक व गंभीर बाबा आहे. राज्यसरकार कडून योग्य ती पावले उचली जात नाहीत. मुख्यमंत्री सहाहयता निधीचा कोविड करीत वापर नाही (सदरील बाबतीत राज्यसरकार विरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे), नांदेड मधील साधूंची हत्या, सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये, दिशा सलियान आणि कंगना राणावत बी एम सी कारवाई, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नसताना देखील कायदा सुव्यवस्था बिघडली या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सुरक्षित अंतर ठेवून वागताना जाणवत आहे ,राष्ट्रीय काँग्रेसने तर अगोदर पासूनच या प्रकरणां पासुन अंतर ठेवले आहे, कॉंग्रेसचे मंत्री आपापल्या कामात व्यग्र आहेत.

तर दुसरीकडे पालघर प्रकरण, मराठा समाज आरक्षण स्थगिती, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे, अभिनेत्री कांगणाच्याच्या कार्यालयावर कारवाईत, निवृत्त नेव्ही ऑफिसरास मारहाण, धुळे, जळगाव येथे शिवसेनेच्या मंत्रांसमोर विद्यार्थीना मारहाण असेल या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांनाच एकटे पडताना निदर्शनास येते मग सरकार म्हणून महाआघाडी सरकारचे अस्तित्व जाणवत नाही चांगल्याच्या श्रेयासाठी सगळे आणि टिकेसाठी मात्र शिवसेना…!

तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिमा ही पारदर्शी आहे त्यांच्या वर विरोधकही टीका करताना दिसत नाहीत पण प्रत्येक संघर्षाच्या किंवा अडचणीच्या प्रसंगी एकटे मुख्यमंत्री व शिवसेनाच का? याचे कोडे उलगडताना दिसत नाही.

शिवसेनेची नव्या रूपातील भूमिका समजून घेताना त्यांच्या आमदारांनाही अवघडल्यासारखे वाटत आहे. अशातच एखाद्या पक्षातील कौटुंबिक प्रश्न किंवा आघाडीतील नाराजी नाट्य पुढे करून येणाऱ्या काळात वेगळाच प्रयोग महाराष्ट्रात होईल का अशी शंका येते पण अपयशाचे खापर आपल्या डोक्यावर नको याची काळजी महाआघाडी तले पक्ष घेताना दिसतात.

याचाच पुढील अंक म्हणून येत्या काळातील नेत्यांची विधाने त्यांच्या भूमिका आणि वास्तव याचाच ताळमेळ बसतोय का हे पाहणे महत्त्वाचे नाहीतर महाराष्ट्राला १९७८ सालच्या खंजिरची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या राजकारणात सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या पक्षाचे होईल हे सांगायला नको…..

लेखक : प्रमोद परदेशी
प्रदेश अध्यक्ष: नमो ग्रुप फाउंडेशन, महाराष्ट्र
मो. ९८६०९८२९४८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here