Sunday, July 25, 2021
Homeदेश-विदेशAadhar-PAN link : पॅनकार्ड आणि आधार कार्ड 30 जूनच्या आधी लिंक करा;...

Aadhar-PAN link : पॅनकार्ड आणि आधार कार्ड 30 जूनच्या आधी लिंक करा; हजार रुपये दंड भरावा लागू शकतो

मुंबई : पॅनकार्ड आणि आधार कार्ड संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड सात दिवसात म्हणजे 30 जूनपर्यंत आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले मंजूर केले.

जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.  तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 30 जूननंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार?

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा.

Source link

Aadhar-PAN link : पॅनकार्ड आणि आधार कार्ड 30 जूनच्या आधी लिंक करा; हजार रुपये दंड भरावा लागू शकतो
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News