Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनhow to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन्...

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

केस हे स्त्रीच्या सौंदर्यात अधिक भर घालतात हे काही वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळेच स्त्रिया आपल्या स्किन इतकीच आपल्या केसांची सुद्धा काळजी घेतात. केसांमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात. काही स्त्रियांचे केस सरळ असतात, काहींचे केस बॉयकट असतात, काहींचे लांबसडक असतात, काहींचे सोनेरी असतात तर काहींचे एकदम मॅगीसारखे कर्ल्स! जसे केस तितकी सुंदरता त्या स्त्रीची उठून दिसते. पण या सर्व प्रकारात कुरळ्या केसांचा प्रकार अर्थात कर्ल्स अधिक प्रसिद्ध आहे.

ज्या स्त्रियांचे केस कुरळे असतात त्यांना एक वेगळेच सौंदर्य लाभते आणि त्या इतर सर्व स्त्रियांमध्ये नेहमीच उठून दिसतात. अशीच बॉलीवूड मध्ये एक अभिनेत्री आहे जी आपल्या कुरळ्या केसांमुळे अधिक जास्त प्रसिद्ध आहे. तिचं नाव म्हणजे सैयामी खेर (saiyami kher) होय.

तिच्या केसांवर चाहते घायाळ

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

सहसा असे समजले जाते की मुलांना कुरळ्या केसांच्या मुली अधिक जास्त आवडतात. जसे की कंगना राणावतच उदाहरण घ्या. तिने जेव्हा डेब्यू केला तेव्हापासून ती सुद्धा आपल्या कुरळ्या केसांसाठी खूप प्रसिद्ध झाली होती. त्याचप्रकारे सैयामी खेरला देखील लाभ मिळाला आणि तिचा पहिल्या चित्रपट ‘मिर्झ्या’ आला व तेव्हापासून ती चाहत्यांची आवडती झाली. इतर अभिनेत्रींच्या केवळ त्वचेचीच स्तुती होते पण सैयामीची त्वचा आणि केस दोन्हींची खूप स्तुती केली जाते. आज आपण तिच्याकडून काही खास ब्युटी केअर टिप्स घेणार आहोत.

(वाचा :- Ramayana Deepika Chikhalia : रामायणातील सुप्रसिद्ध व मनमोहक सौंदर्यवती सीतामाता आजही घालतीये तरुणांना भुरळ, का गाजवतीये लाखो मनांवर अधिराज्य?)

ग्लोइंग स्किनचे रहस्य

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

सैयामीच्या त्वचेवर नेहमी दिसून येणारा गोल्डन ग्लो तुमच्या नजरेस पडला नसेल तर नवलच! यामुळे ती अधिक जास्त खुलून दिसते. सैयामी या ग्लोचे श्रेय तिच्या जीवनशैली मधील अगदी छोट्या छोट्या गोष्टींना देते. ज्यामुळे तूमची त्वचा अधिक ग्लो करते आणि खूप स्वच्छ राहते. ती दरोरोज सनस्क्रीन आणि मॉइश्चराइजर लावते. घरात नो रूल मेकअप फॉलो करते. शूट नंतर लवकरात लवकर आपला मेकअप रिमुव्ह करते. त्वचा स्वच्छ ठेवून नेहमी हायड्रेटेड ठेवते, शिवाय मुख्य गोष्ट म्हणजे ती खूप स्ट्रेस फ्री राहते.

(वाचा :- Madhuri Dixit Beauty :- धकधक गर्ल माधुरी दीक्षितने परिधान केले विविधरंगी लेहंगे, सौंदर्यवतीरुन घायाळ चाहत्यांची नजरच हटेना!)

असे असते डेली रुटीन

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

सैयामी म्हणते की सुंदर त्वचा आणि स्वस्थ त्वचा तुमच्या आहारावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते, ती कबुल करते की आहाराच्या बाबतीत ती खूप सतर्क असते. ती आपल्या आहारात त्याच पदार्थांचा समावेश करते जे तिच्यासाठी पौष्टिक असतील. ती हायजीनवर देखील पूर्ण लक्ष ठेवते. बाहेरील फास्ट फूड आणि जंक फूड पासून ती शक्य तितकी दूर राहते. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती शक्य तितके जास्त पाणी पिते. जेणेकरून त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि शरीरात ते जमा होणार नाहीत. हे विषारी पदार्थ त्वचा खराब करतात आणि विविध आजारांना आमंत्रण सुद्धा देऊ शकतात.

(वाचा :- Sonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या मादकतेने चाहते घायाळ, फॉलोअर्ससमोर दिली लॉकडॉऊनमधील ‘या’ प्रयोगांची कबुली!)

डार्क सर्कलची समस्या

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

मुलगा असो वा मुलगी कोणालाच आपल्या चेहऱ्यावर असलेले डार्क सर्कल्स आवडत नाहीत. कारण हे चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. त्यात जर तुम्ही अभिनय क्षेत्रात असाल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या करियर वर सुद्धा होऊ शकतो. सैयामीला सुद्धा डार्क सर्कल्सची समस्या आहे.. खरंतर ही समस्या तिच्या वंशातच आहे, जी पिढी दर पिढी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळत आहे. यापासून बचाव करण्यासाठी सैयामी रात्री झोपण्याआधी नाईट क्रीमचा वापर करते. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात आणि त्वचेवरील किंवा डोळ्यांखालील काळे डाग दिसून येत नाहीत.

(वाचा :- कणखर, महत्वाकांक्षी, झिरो फिगर-फिट बॉडी, पन्नाशीतही सेक्सी दिसणारी ही अभिनेत्री आजही देते टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर!)

फ्लॉलेस आणि सॉफ्ट स्कीन

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!

सैयामीला जेव्हा तिच्या फ्लॉलेस आणि सॉफ्ट स्कीनचे सिक्रेट विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “माझे सिक्रेट तुम्हाला थोडे विचित्र वाटू शकते. मी जेव्हा कधी माझ्या गावी जाते तेव्हा तेथील शांत आणि सुंदर अशा तलावात अंघोळ करून त्या तलावाची माती पूर्ण शरीरावर लावून घेते. ही माती लावल्यावर मी काही वेळ तशीच पडून राहते आणि मग त्या तालावर पुन्हा अंघोळ करते. यामुळे माझी त्वचा खूप सॉफ्ट आणि स्वच्छ होते. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मड बाथ हा सुंदरता वाढवण्याचा खूप प्राचीन उपाय आहे, याचे फायदे आणि त्वचेवर दिसणारे परिणाम आजच्या आधुनिक युगाला देखील भुरळ घालत आहेत. त्यामुळे हा प्रकार जरी किळसवाणा वाटत असला तरी खासकरून अभिनेत्री स्वत:ची सुंदरता जपण्यासाठी याचा आवर्जून वापर करत आहेत. मड बाथ मुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात असेही म्हटले जाते.

(वाचा :- ‘या’ आहेत बॉलीवूडमधील सध्याच्या सर्वात हॉट-बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री, केलंय लाखो हृदयांना घायाळ!)Source link

how to make your skin glow naturally at home: चमकदार-घारे डोळे अन् कर्ली हेअर्स, हिट सिनेमे देणा-या ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजावर करोडो चाहते घायाळ!
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News