गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल; अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये

0
38

पुणे, 11 जून: देशातील एक महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. मागील काही वर्षांपासून पुण्याची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. देशातील बरेच युवक शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक होतं आहे. दिवसेंदिवस विस्तार वाढणाऱ्या या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शहरात घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘My Pune safe’ नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

हे अ‍ॅपमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकतो, अशा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. या अ‍ॅपची पुणेकरांनाही खूप मदत होणार आहे. यासोबतचं पोलीस प्रशासना बदली अ‍ॅपची निर्मिती देखील केली आहे. या दोन्ही अ‍ॅपचे उद्धाटन नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. ‘माय पुणे सेफ’ ॲप आणि बदली सॉफ्टवेअरची निर्मिती पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

माय पुणे सेफ ॲपची वैशिष्ट्ये:

  • पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिसांच्या दैनंदिन गस्तीसाठी हे अ‍ॅप खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शहरात सध्याच्या घडीला काय सुरू आहे. याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
  •  हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलं आहे.
  •  या अ‍ॅपच्या मदतीने गस्तीदरम्यान गुन्ह्यांना त्वरित आळा घालता येणार आहे.
  •  गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एखाद्या ठिकाणी भेट दिल्यानंतर संबंधित ठिकाण सेफ असल्याचा पुरावा म्हणून ‘माय सेफ पुणे’ अॅपवर सेल्फी अपलोड करता येणार आहे.
  •  दरम्यान संबंधित ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश आणि वेळ नोंद आदी सर्वांची नोंद केली जाणार आहे.
  •  या ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहितीही उपलब्ध होणार आहे.
  •  बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली ? याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲपमध्ये उपलब्ध राहणार आहे.

यासोबतचं बदली सॉफ्टवेअर पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया पारदर्शकपणे मनासारखी बदली करून घेण्यास मदत होणार आहे.


Source link