Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाIND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी...

IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार | Indian Opener Shubman Gill injured so Who WIll open For India At India vs England Test series Mayank Agarwal KL Rahul Abhimanyu Easwaran and Hanuma Vihari are optionsभारताचा कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा सोबत सलामीला उतरणारा शुभमन गिल दुखापत ग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताला नव्या सलामीवीराची गरज भासणार आहे.

1/5

Shubhman Gill injured

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात पराभवानंतर आता भारत इंग्लंड विरोधात 5 सामन्यांची
कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या सामन्यांआधी भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे जर सामन्यांपूर्वी तो फिट झाला नाही
तर भारतीय संघाला नवा सलामीवीर खेळवावा लागेल.

2/5

Mayank Agarwal

तर शुभमन जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयांक अगरवाल (Mayank Agarwal). कारण याआधी इंग्लंड दौऱ्यावर मयांक
इंग्लंड विरोधात सलामीला उतरला असून त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली होती. त्याने भारतीय संघाकडून 14 टेस्टमध्ये 45.73 च्या सरासरीने
1 हजार 52 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश आहे.

3/5

k l rahul

गिलच्या जागेसाठी दुसरा प्रबळ दावेदार आहे भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul). राहुलने याआधी मुरली विजयसह मिळून भारतासाठी
काही कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. एका यष्टीरक्षकाची भूमिकाही राहुल निभावू शकत असल्याने त्यालाही या जागेचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
राहुलने भारतीय संघासाठी 34.58 च्या सरासरीने 36 टेस्टमध्ये 2 हजार 6 धावा केल्या आहेत. ज्यात 5 शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

4/5

hanuma v

लोकेश आणि मयांक यांच्याशिवाय आणखी एक फलंदाज सलामीसाठी उतरु शकतो. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari)
हनुमा याआधी भारताकडून सलामीसाठी उतरला असून त्याने एका संयमी खेळीचे दर्शन केले आहे. त्यामुळे गिलच्या जागी सलामीसाठी विहारीची वर्णी देखील लागू शकते.

5/5

abhimanyu easwaran test

या सर्व अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघाकडे आणखी एक खेळाडू सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. तो म्हणजे
भारतीय संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran). 25 वर्षीय अभिमन्यूने
64 प्रथम श्रेणी सामन्यांत 4 हजार 402 धावा केल्या आहेत. 43.57 च्या सरासरीने केलेल्या या धावांमध्ये 13 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.Source link

IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, 'हे' आहेत प्रमुख दावेदार | Indian Opener Shubman Gill injured so Who WIll open For India At India vs England Test series Mayank Agarwal KL Rahul Abhimanyu Easwaran and Hanuma Vihari are options
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News