Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाIND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी...

IND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Video | Indian Team on Sri Lanka Tour Coach Rahul Dravid teaching Players whole Training video of Team Shared by BCCIश्रीलंका दौऱ्यावर असलेल्या युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून धडे देत आहे. दरम्यान हे नव्या दमाचे खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

IND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Video

Rahul dravin on Sri lanka tour

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंड संघाकडून पराभूत झालेला भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेची वाट पाहत आहे. मात्र त्याआधी भारताचे युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाने नुकताच विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन सरावाला सुरुवात केली आहे. याच सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. (Indian Team on Sri Lanka Tour coach Rahul Dravid teaching Players whole Training video of Team Shared by BCCI)

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. दरम्यान ही एकदिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी खेळाडू जोमात सराव करत आहेत. ज्यात संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खेळाडूंचा सराव घेत आहे. कसून मैदानी व्यायाम करत खेळाडू इतर खेळ खेळून देखील स्वत:ला फिट ठेवण्यासाठी झटत आहेत. तर सोबतच मजा-मस्करी करुनही सर्वजण एक हसतं खेळतं वातावरण राखण्याचा प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयने या सर्वाचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात द्रविड म्हणतो की, ”भारतीय संघातील खेळाडू मागील 17 ते 18 दिवसांपासून विलगीकरणात आहेत. आधी भारतात मग इथे विलगीकरणात असणाऱ्या खेळाडूंना अखेर बाहेर पडून एकमेंकाना भेटायची संधी मिळाली आहे. हे सर्वांसाठी चांगला असून यामुळे त्यांना फायदा होईल.”

पाहा व्हिडीओ –

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दौऱ्याची सुरुवात वन डे मालिकेने होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वन डे, तर 22, 24 आणि 27 जुलैला टी ट्वेण्टी मालिका खेळवण्यात येतील.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिका

पहिला वन डे – 13 जुलै
दुसरा वन डे – 16 जुलै
तिसरा वन डे – 18 जुलै

हे ही वाचा :

भारतीय क्रिकेटर्सना अच्छे दिन, मॅच फी वाढवण्याचा BCCI चा निर्णय, पाहा आता किती पैसे मिळणार?

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

सामन्यापूर्वी सेक्स करा, भारतीय क्रिकेटपटूंना कोचने दिला होता सल्ला, खळबळजनक प्रसंग समोर!

(Indian Team on Sri Lanka Tour Coch Rahul Dravid teaching Players whole Training video of Team Shared by BCCI)

Source link

IND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Video | Indian Team on Sri Lanka Tour Coach Rahul Dravid teaching Players whole Training video of Team Shared by BCCI
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News