Monday, June 21, 2021
Homeमहाराष्ट्रवीज खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या या क्रमांकावर त्वरित कळवावे

वीज खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या या क्रमांकावर त्वरित कळवावे

मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

सध्या काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने महावितरणची यंत्रणा पावसाळ्यापुर्वीच्या कामावर लागली आहे. पावसाळ्यासाठी पूर्व तयारी करून महावितरण नेहमीच सज्ज असते. परंतु, काही अनपेक्षित कारणामुळे पावसाळ्यात कधी-कधी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

 
तर काही वेळा जोरदार पावसामुळे काही ठिकाणी उपकेंद्रात किंवा अन्य विद्युत यंत्रणेच्या भोवती पाणी साचते. अशा वेळी, सुरक्षीततेच्या कारणास्तव महावितरणला वीजपुरवठा बंद करावा लागतो. मात्र, वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर असते.

 ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये व त्यांचा खंडित झालेल्या वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करतात. परंतु, याबद्दल माहिती देण्याकरिता ग्राहकांनी महावितरणच्या डीएसएस मोबाईल क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दलची तक्रार नोंदावी असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना केले आहे.

भांडूप परिमंडलातील तीनही मंडळात पावसाळ्या पूर्वीचे दुरुस्तीची कामे पूर्ण करणार असून तरीही, पावसाळा सुरु झाला की कधी जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडतात, अथवा काही इतर कारणांमुळे सुद्धा काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो. अशा वेळी आपण कुठे संपर्क करावा? असा प्रश्न वीज ग्राहकांना पडतो. तर, महावितरणतर्फे प्रत्येक मंडळांतर्गत एक डीएसएस कंट्रोल रूम पूर्वीपासून स्थापित करण्यात आलेले आहेत.

परंतु, अनेक ग्राहकांना डीएसएस कंट्रोल रूमबद्दल माहिती नाही किंवा त्यांना त्यांच्या ‘डीएसएस कंट्रोल रूमचे’ मोबाईल क्रमांक माहित नसल्यामुळे अनेकदा गैरसोय होते. ग्राहकांनी आपल्या मंडळातील डीएसएस कंट्रोल रूमला कॉल करून वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल माहिती द्यावी. त्यानंतर ‘डीएसएस कंट्रोल रूम’ मधील कर्मचारी त्वरित संबंधित विभागातील अधिकाऱ्याला वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल माहिती देतील व सदर कार्यालय त्यावर शीघ्र कारवाई करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा कामाला लागतील.

भांडूप परिमंडलांतर्गत ठाणे व वाशी मांडळातील ग्राहकांनी ९९३०२६९३९८ / ८८७९९३५५०१ तर पेण मंडळातील ग्राहकांनी ७८७५७६५५१० या क्रमांकावर संपर्क करून आपला वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल माहिती द्यावी असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.सुरश गणेशकर यांनी ग्राहकांना केले आहे. जेणेकरून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती थेट संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पाहोचेल व वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात मदत होईल.


तसेच असे निदर्शनास येत आहे की, संबंधित शाखा अभियंते/उपविभागीय अभियंते व जनमित्र सदर वीजपुरवठा पूर्ववत करत असताना, काही वेळ ग्राहकांचे फोने कॉल ला प्रतिसाद न दिल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता टाळनेसाठी सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की आपली तक्रार सदर डीएसएस मध्ये नमूद करावी तसेच टॉल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५/ १८००१०२३४३५/ १९१२ वर करावीत ही विनंती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW