Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाIPL 2021 New Schedule : BCCI चं वेळापत्रक तयार, आयपीएलच्या तारखाही ठरल्या?...

IPL 2021 New Schedule : BCCI चं वेळापत्रक तयार, आयपीएलच्या तारखाही ठरल्या? | BCCI May Release IPL 2021 Schedule on 28 june says report
कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली यंदाची आयपीएल लवकरच सुरु होणार आहे. युएईमध्ये आयपीएलचे उर्वरीत सामने होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली होती.

IPL 2021 New Schedule  : BCCI चं वेळापत्रक तयार, आयपीएलच्या तारखाही ठरल्या?

ipl 2021 trophy

मुंबई : बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) कोरोनाच्या संकटात (Corona Panedemic) देखील सर्व सुरक्षेची काळजी घेऊन एप्रिलमध्ये सुरु झाली होती. पण मे महिन्यात काही खेळाडूंनाच कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल 2021 स्थगित करण्यात आली. मात्र काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने (BCCI) उर्वरीत आयपीएल युएईमध्ये घेणार असल्याचे जाहिर केले. आयपीएलचे उर्वरीत सामने होणार असून कुठे होणार हेही माहिती झाले आहे. मात्र सामने सुरु होण्याची नेमकी तारीख अद्यापर्यंत समोर आलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 28 जूनरोजी बीसीसीआय उर्वरीत आयपीएलचे सर्व सविस्तर वेळापत्रक जाहिर करु शकते. (BCCI May Release IPL 2021 Schedule on 28 june says report)

यंदाची आयपीएलची सुरुवात कोरोनाचे संकट असतानाही सर्व काळजी घेऊन भारतातील महत्त्वांच्या शहरात सुरु झाली. मात्र 29 सामने झाल्यानंतरच कोरोनाचा शिरकाव झाल्याने उर्वरीत आयपीएल स्थगित करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयच्या एका विशेष कार्यकरीणी सभेत उर्वरीत आयपीएलबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेत उर्वरीत आयपीएल युएईत होणार असल्याचे जाहिर केले. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान हे उर्वरीत 31 सामने घेणार असल्याचेही समोर आले होते.

असे असू शकते वेळापत्रक

आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये 29 सामने झाले असून उर्वरीत 31 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या उर्वरीत 31 सामन्यांत 27 लीग गेम्स आणि 3 डबल हेडर सामने होतील. दरम्यान आतापर्यंत सूत्रांच्या माहितीनुसार 19 सप्टेंबरला स्पर्धा सुरु होऊ शकते. तर 15 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.

परदेशी खेळाडूंचा प्रश्न कायम

संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर अधिक चर्चा झाली. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या (T-20 Wordl Cup 2021) मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका असेल यावर परदेशी खेळाडूंचे आयपीएलमध्ये खेळणे अवलंबून आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक

दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता.

संबंधित बातम्या  

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

IPL Suspend : कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित

(BCCI May Release IPL 2021 Schedule on 28 june says report)Source link

IPL 2021 New Schedule : BCCI चं वेळापत्रक तयार, आयपीएलच्या तारखाही ठरल्या? | BCCI May Release IPL 2021 Schedule on 28 june says report
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News