Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनहेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा...

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

जावेद हबीब (jawed habib) म्हणजे हेअर केअर क्षेत्रातील एक मोठे नाव, केवळ भारतातच नाही तर जगभरात जावेद हबीब हे नाव प्रसिद्ध आहे. मोठमोठे सेलिब्रिटीज त्यांच्याकडूनच आपल्या हेअर स्टाईल करून घेतात. सामान्य माणसाची सुद्धा अशी इच्छा असते की एकदा तरी जावेद हबीब सलून मध्ये जाऊन हेअरस्टाईल करून घ्यावी. तर असे हे जावेद हबीब सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतात आणि तेथून नेहमी आपल्या चाहत्यांना हेअर केअर टिप्स देत असतात.

आज आम्ही तुम्हाला जावेद हबीब यांनी शेअर केलेली एक हेअर ग्रोथ ट्रिटमेंट सांगत आहोत, जी आठवड्यातून एकदा केल्याने देखील तुमचे केस जलद गतीने लांबसडक आणि घनदाट होतील. ही ट्रिटमेंट करणे अत्यंत सोप्पे असून तुम्हाला यासाठी केवळ 15 मिनिटे आणि आठवड्यातील फक्त एक दिवस द्यावा लागेल. या एवढ्या वेळात तुम्ही तुमचे उपचार तयार करू शकता आणि ते केसांवर लावून हेअर वॉश देखील करू शकता. म्हणजे फक्त 15 मिनिटे तुमच्या केसांचे आरोग्य अधिक निरोगी राखू शकतात.

जावेद हबीबने सांगितले सिक्रेट

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

जावेद हबीब यांनी सांगितले की घरच्या घरी कोणत्याही केमिकल शिवाय केसांची ग्रोथ वाढवली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या घरी असणाऱ्या दोन कच्च्या भाज्यांची गरज लागते. या दोन भाज्या घरी नसतील तरी तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या दोन भाज्यांपासून विशिष्ट प्रमाणात तयार होणारा हा अर्क केसांसाठी अत्यंत उपयोगी असून यामुळे काहीच काळात तुम्हाला फरक जाणवू लागेल. चला तर जाणून घेऊया काय आहे हा पूर्ण उपाय!

कांदे आणि आल्याचे सिक्रेट

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

जावेद हबीब यांनी आपल्या एका व्हिडिओ मध्ये सांगितले की कांदा आणि आले वाटून घेऊन त्याचा रस तयार करावा आणि दोन्ही रस मिक्स करावेत. या मिक्स मध्ये 50 टक्के कांद्याचा रस आणि 50 टक्के आल्याचा रस असला पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्या की कांदा आणि आले यांचा हा रस फ्रेश असला पाहिजे. कारण जर पूर्णपणे हर्बल आणि फ्रेश हेअर ग्रोथ लिक्विड असेल तर त्याचा केसांवर लवकर परिणाम होईल आणि केसांची वाढ अधिक वेगाने होऊ लागेल.

अशा प्रकारे करावा उपयोग

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

कांदा आणि आल्याचं हे लिक्विड मिक्स केसांच्या मुळापाशी लावायचे असते. कारण केसांच्या वाढीसाठी मुळांना योग्य पोषण आणि स्केल्पला इंफेक्शन क्युअर ट्रिटमेंटची गरज असते. तेव्हाच केस मोठे होतात. हे लिक्विड मिक्स तुम्हाला फक्त आणि फक्त 10 मिनिटे आपल्या केसांना लावून ठेवायचे आहे. यानंतर शॅम्पू करावा. कोणतीही ट्रिटमेंट ही योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाहीतर दिसून येणाऱ्या परिणामांमध्ये आणि निष्कर्षामध्ये फरक दिसू शकतो.

आठवड्यातून केवळ एकदा

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

जावेद या बाबत पूर्ण विश्वास देतात की केवळ आठवड्यातून 10 मिनीटांसाठी ही ट्रिटमेंट केल्याने काही दिवसांतच केसांच्या वाढीवर फरक दिसू लागेल. अशा उपायांमध्ये संयम अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीच्या केसांच्या स्थितीनुसार आणि शारीरिक जडणघडणीनुसार फरक दिसतो. त्यामुळे कोणाला हा फरक अत्यंत लवकर दिसेल किंवा कोणाला हा फरक दिसण्यात वेळ लागेल. मात्र उपाय थांबवू नये. फरक हा नक्की दिसेल आणि तुमचे केस सुद्धा वाढतील.

केसगळती रोखण्यासाठी टिप्स

हेअर स्टाइलमधील बादशाह जावेद हबीबने सांगितला सोपा उपाय, लांबसडक केसांसाठी आठवड्यातून एकदा ट्राय करा!

जर तुम्ही केस गळतीने त्रस्त असाल तर पुढे दिलेल्या काही टिप्स नक्की वापरा. केस गळती होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे केस गळती रोखण्यात मोठी सहाय्यता मिळेल. खूप पाणी आणि द्रव पदार्थ प्या आणि संतुलित आहार घ्या जेणेकरून शरीरात कमी झालेले खनिज पदार्थ आणि पोषक तत्वे यांची तुट भरून काढता येईल. स्त्रीने आपल्या आहारात फळे, बेरीज, हिरव्या पालेभाज्या, रताळे, सुका मेवा, मासे, अंडी, कडधान्ये, सोया युक्त पदार्थांचा समावेश करावा. अँटीऑक्सिडेंट्स सारखे काम करणारे पदार्थ केसांच्या फॉलीकल्सना सुरक्षा देतात म्हणून असे पदार्थ आवर्जून खावेत. व्हिटॅमिन ए, सी, डी आणि ई सुद्धा आपल्या आहारात आवर्जून सामील करून घ्या.

NOTE :- प्रत्येकांच्या समस्या व केसांची पोत वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामुळे हा उपाय प्रत्येकासाठीच किती रामबाण ठरेल हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या केसांची गरज ओळखून व एखाद्या ब्युटिशिअनचा सल्ला घेऊनच केसांवर उपाय करावेत.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW