माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
19

कल्याण (प्रतिनिधी) | शासन नामा न्यूज ऑनलाईन

निसर्गाच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहचल्या असून अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी छत्रपती शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष धनंजय पाठक, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाचा शुभारंभही नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

नूतन विद्यालयाच्या मैदानात ५ वर्षांपूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लावलेल्या झाडाचा ५ वा वाढदिवस पवार यांच्याच हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक, पाम, चिंच, कडू लिंब यासह अनेक औषधी वनस्पती असलेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणवासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रभागात, सोसायटी व चाळ परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कल्याणकरांनी मोठा प्रतिसाद देत अनेक प्रभागात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते यासर्व ठिकाणी नरेंद्र पवारांनी हजेरी लावून वृक्षारोपण केले.

प्रभाग क्र.३२ सिध्देश्वरआळी येथे नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी वार्डअध्यक्ष श्री.महेश केळकर,सुधीर जोशी,समृध्दी देशपांडे, राधेश्याम काबरा, श्रीपाल जैन, किशोर खैरनार, राहुल भोईर, सुनिल मारवाडी, पटवर्धन काकू, श्रीधर देवस्थळी, मंदार संत,अजय राठोड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १ फडके मैदान परिसरात भाजपाच्या प्रिया शर्मा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भावना मनराजा, नम्रता चव्हाण, ज्योतिताई भोईर आदी उपस्थित होते.

प्रभाग २ कोलीवळी येथील वृंदावन सोसायटी परिसरात नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय कारभारी, मिलिंद सिंग, मेघनाथ भंडारी, भाऊराव तायडे, नम्रता चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रभाग ४ मध्ये गौरीपाडा येथे भाजपा कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुन म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला मा आमदार नरेंद्र पवार,महिला अध्यक्षा मीरा खरे, वॉर्ड अध्यक्ष महेश केणे, जेष्ठ कार्यकर्ते श्याम केणे आदी उपस्थित होते.

प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण आयोजित केले यावेळी मेघा खेमा, जितेश घोलप, सतीश बोबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.