Monday, June 21, 2021
Homeमनोरंजनबॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे...

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

बॉलिवूडची हॉट मॉम अर्थात करिना कपूर खानने वयाच्या तिशीनंतर आई बनण्याचा निर्णय घेतला. तिने दोन्ही प्रेग्नेंसीमधील बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. बॉलिवूडच्या बेबोची प्रेग्नेंसी म्हणजे टॉक ऑफ द टाउन ठरली होती. दोन प्रेग्नेंसीनंतर देखील आज ती तितकीच फिट आहे. करिनाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा तर होत्याच पण त्याचबरोबरीने आणखी एका चर्चेने डोकं वर काढलं ते म्हणजे दुसऱ्यांदाही सिझेरियन करणं योग्य आहे का? पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये जर सिझेरियन डिलिव्हरी झाली तर दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान सिझेरियनच करावं लागतं का?, दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात असतात.

अर्थात अशा प्रकारचे विचार मनात येणं स्वाभाविक आहे. सारखं सिझेरियन करणं सुरक्षित आहे की नाही हा देखील स्त्री वर्गाला पडलेला मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आज या लेखाच्या आधारे सिझेरियन डिलिव्हरी करणं कितपत योग्य आहे? महिलांसाठी ही डिलिव्हरी सुरक्षित आहे का? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

​सिझेरियन डिलिव्हरी कधी होते?

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

पहिल्यांदा सिझेरियन डिलिव्हरी झाली आहे आता पुन्हा तिच डिलिव्हरी करावी लागणार म्हंटल्यावर स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. पण डिलिव्हरी नॉर्मल होणार की सिझेरियन हे प्रसूतीवर आणि त्यादरम्यान घडणाऱ्या प्रसंगावर अवलंबून असतं. जर एखादी स्त्री वेदना सहन करण्यास सक्षम असेल किंवा तिला आरोग्याशी संबंधित इतर कोणत्या अडचणी नसतील तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण याउलट परिस्थिती असेल आणि स्त्रिया नॉर्मल डिलिव्हरीसाठी सक्षम नसतील तर सिझेरियन डिलिव्हरी केली जाते. महिलांचं आरोग्य लक्षात घेऊनच नॉर्मल डिलिव्हरी करायची की सिझेरियन डिलिव्हरी करायची हा निर्णय डॉक्टर घेतात.

​कितीवेळा सी-सेक्शन करू शकतो?

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सी-सेक्शन किती वेळा केलं पाहिजे हे काही ठरलेलं नसतं. स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेता तसेच प्रसुतिदरम्यान निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता सिझेरियन करावं की नाही हा निर्णय डॉक्टर घेतात. काही अनुभवी डॉक्टर सांगतात, एका स्त्रीचे तब्बल ६ सी-सेक्शन झाले आहेत. आणि हे सगळे सी-सेक्शन अगदी सुरळीत झाले. मात्र सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत हे घडतचं असं नाही. काही स्त्रियांना दुसऱ्या सिझेरियनवेळी त्रास देखील सहन करावा लागतो. त्यामुळे किती सिझेरियन झाले पाहिजेत याबाबत कोणतीच संख्या अद्याप निश्चित नाही.

​सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

सिझेरियन डिलिव्हरीनंतर नॉर्मल डिलिव्हर व्हावी अशी बऱ्याच स्त्रियांची इच्छा असते. सिझेरियन डिलिव्हरीनंतर नॉर्मल डिलिव्हरी देखील होऊ शकते असं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण काही डॉक्टर सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरीचा सल्ला स्त्रियांना देत नाहीत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सिझेरियन डिलिव्हरीनंतर नॉर्मल डिलिव्हरी करत असताना गर्भाशयाला ईजा पोहचण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

​करिनाची दुसरी डिलिव्हरी

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पहिली डिलिव्हरी सी-सेक्शनमध्ये करावी लागली तर दुसरी डिलिव्हरी देखील सी-सेक्शनेच करावी लागते. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं बहुदा घडत असावं. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानच्या बाततीत देखील असंच घडलं. पहिल्या प्रेग्नेंसीदरम्यान करिनाला सिझेरियन करावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान देखील करिनाला सिझेरियनचाच पर्याय निवडावा लागला. नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी अशी बऱ्याच स्त्रियांची इच्छा असते. मात्र हे सारं काही स्त्रियांच्या आरोग्यावर आणि डॉक्टरांच्या निर्णयावर अवलंबून असतं.

​तज्ज्ञांचं मत काय?

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टर सोनिया चावला सांगतात, पहिल्या सिझेरियन डिलिव्हरीनंतर पुन्हा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. परंतू हाय रिस्क प्रेग्नेंसी, मुलांचं डोकं योनी मार्गाकडे नसणं, प्रेग्नेंसीमध्ये खूप अडचणी निर्माण झाल्यावर ऑपरेशनच करावं लागतं. पण आरोग्यविषयक किंवा प्रेग्नेंसीदरम्यान कोणतीच समस्या नसेल तर नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच प्रसूतीदरम्यान काही अडचणी निर्माण झाल्या तर सिझेरियन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. डॉक्टर चावला यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्यांदा देखील ऑपरेशन टाळण्यासाठी गर्भवती महिला कोणतेच उपाय करू शकत नाही.

​‘या’ गोष्टींमुळे घ्यावा लागतो निर्णय

बॉलिवूडच्या हॉट मॉमचं दुसऱ्यांदा झालं सिझेरियन, पहिल्या सिझरनंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी करावी लागणार की सिझेरियन डिलिव्हरी हे काही गोष्टींवर आधारित असतं.

– दोन प्रेग्नेंसीमध्ये किमान अंतर असणं गरजेचं असतं. सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी दोन प्रेग्नेंसीमध्ये किमान १८ महिन्यांचं अंतर असणं गरजेचं आहे.

– सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी नऊ महिने गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाचं वजन देखील पाहिलं जातं. तसेच मुलांची पोझिशन देखील महत्त्वाची असते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी मुलांचं डोकं योनीमार्गाकडे असणं गरजेचं आहे.

– तसेच दुसऱ्यांदा नॉर्मल डिलिव्हरीचा निर्णय घेत असताना पहिल्या सिझेरियन डिलिव्हरीचे टाके देखील पाहिले जातात.

दोन सिझेरियन डिलिव्हरीनंतरही करिना आहे इतकी फिट

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW