kareena kapoor saif ali khan relationship tips: मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का? – kareena kapoor talked about how she stopped overreacting in relationship steps to developing patience

0
24


दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत प्रेमाचे नाते जोडतात, त्यावेळेस केवळ प्रेम पुरेसे नसते. तर सहनशीलता आणि संयम यासारख्या शब्दांचा अर्थ देखील समजणं अत्यंत गरजेचं असते. छोट्या-छोट्या गोष्टी आपण संयमाने हाताळायला शिकता, त्यावेळेस तुमचे नाते परिपूर्ण होते. प्रत्येक गोष्टीवर राग येणे, काहीही जाणून-समजून न घेता प्रतिक्रिया देणे यासारख्या गोष्टींमुळे जोडीदारासोबतचे तुमचे नाते खराब होऊ शकते.

स्वतःवर संयम असेल तर आपण कितीतरी गोष्ट सहजरित्या मिळवू शकता. तुमचे प्रेमाचे नाते सुद्धा योग्य पद्धतीने फुलवण्यास मदत मिळेल. संयमी व्यक्तीमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता अधिक असतेच, शिवाय आपल्या नात्यामध्ये गोडवा कायम कसा टिकवून ठेवावा; याचीही उत्तम जाण त्यांना असते. कोणत्या कारणांमुळे संयम गमावला जाऊ शकतो, हे तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर – खाननंही असाच एक किस्सा सांगितला होतो, ज्यामुळे तिला नात्यात संयम बाळगण्याचे महत्त्व समजले. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
(‘भविष्यातील योजना उद्ध्वस्त झाल्या, मी कोलमडले’ अभिनेत्रीनं व्यक्त केलं दुःख! नात्यात तुम्हीही या चुका करताय?)

​करीनाने घेतली ही शपथ

kareena kapoor saif ali khan relationship tips: मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का? - kareena kapoor talked about how she stopped overreacting in relationship steps to developing patience

सैफ अली खानसोबतचे नाते मजबूत असण्यामागील कित्येक कारणे करीना कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. आठवणींना उजाळा देत अभिनेत्रीनं सांगितलं की, ‘एके दिवशी कितीतरी तास उलटल्यानंतरही सैफचा फोन न आल्याने मी खूप अस्वस्थ झाले होते. पण नंतर जेव्हा मला कळलं की तो माझ्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज पार्टीचाच प्लान आखत आहे, त्यादिवशी मी संयम बागळण्याची शपथ घेतली’

केवळ करीनाच नव्हे तर कित्येक लोक आपल्या पार्टनरसोबत कळत-नकळत असेच वागतात. कारण त्यांच्यामध्ये संयम नसतो. वेळेनुसार संयम न बाळगल्यास नात्यात समतोल राखणं कठीण ठरू शकते.

(‘तासन् तास एकाच खोलीत असूनही आम्ही बोलत नाही’, काजोलशी असं आहे अजयचे नाते, जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट)

​जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा करू नका

kareena kapoor saif ali khan relationship tips: मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का? - kareena kapoor talked about how she stopped overreacting in relationship steps to developing patience

जोडीदाराकडून नको-नको त्या अपेक्षा करणं आपल्या नात्यासाठी अजिबात चांगले नाही, हे लक्षात घ्या. कारण अपेक्षा पूर्ण न झाल्यास संयम गमावला जाण्याची शक्यता असते आणि यामुळे नात्यात वाद निर्माण होऊ शकतात. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो, प्रत्येकाकडून छोट्या-मोठ्या चुका होतच असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच अपेक्षा कमी ठेवून जोडीदाराला पाठिंबा देण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जोडीदारासोबत आपले संबंध कसे हाताळायचे हे शिकले पाहिजे, यासाठी राग-संतापाची नव्हे तर संयमाची आवश्यकता असते.

(कपूर बहिणींमधील तणाव! एकाच घरात राहूनही करिश्मा बहिणीशी संवाद साधत नव्हती, कारण…)

​जोडीदाराच्या भावनांचा आदर करा

kareena kapoor saif ali khan relationship tips: मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का? - kareena kapoor talked about how she stopped overreacting in relationship steps to developing patience

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, पण बऱ्याचदा गोष्टी व्यवस्थित होत नसल्यानं संंबंधित व्यक्तीला भरपूर राग येतो आणि सर्व राग जोडीदारावर काढला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करता. पण याऐवजी त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा.

जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या नात्यातील अंतर वाढू शकते. प्रत्येक वेळेस रागराग करण्याऐवजी संयम सुद्धा बाळगणे आवश्यक आहे. असे केल्यास तुम्हाला आपल्या जोडीदाराप्रति प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासही मदत मिळेल. तसंच तुम्हाला राग येत असल्यास काहीही बोलण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं डोके थोड्या वेळाने आपोआप शांत होईल.

(‘पुरुषाशी तोपर्यंत जवळीक साधू शकत नाही, जोपर्यंत…’ रेखा यांच्या विधानामुळे उडाली होती खळबळ, नात्याची ही व्याख्या कितपत योग्य?)

​सकारात्मक दृष्टीकोन

kareena kapoor saif ali khan relationship tips: मोठी चूक घडल्यानंतर करीना कपूरनं घेतली ‘ही’ शपथ, तुमचाही स्वभाव असाच आहे का? - kareena kapoor talked about how she stopped overreacting in relationship steps to developing patience

जेव्हा आपण नात्याबाबत नकारात्मक विचार करता, त्यावेळेस समस्या निर्माण होऊ लागतात. नकारात्मकतेमुळे मनामध्ये वाईट विचारांचा गोंधळ सुरू होऊ लागतो. यातून काहीही वाईट घडू नये तसंच जोडीदारासोबतचे नाते मजबूत व्हावे, यासाठी त्याच्यावर/ तिच्यावर विश्वास ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जोडीदाराला घरी यायला उशीर झाल्यास किंवा त्याचा फोन बंद असेल तर रागावू नका. याऐवजी त्यामागील कारण जाणून घ्या. तसंच तुम्हाला तुमच्या जोडीदाराची खूप काळजी वाटते, हे देखील त्याला/तिला पटवून द्या.

(‘लग्न माझ्यासाठी तडजोड नव्हे’ ऐश्वर्याचे वैवाहिक जीवनावर मोठे विधान, बदलेल तुमचाही दृष्टीकोन)

करीना व सैफची एक नंबर जोडी

Source link