Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाKiren Rijiju on Twitter : अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्याच्या गाड्या, क्रीडा मंत्री रिजिजू...

Kiren Rijiju on Twitter : अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्याच्या गाड्या, क्रीडा मंत्री रिजिजू यांनी फटकारले

पुणे : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहने गेल्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मंत्री व इतर मान्यवरांना लिफ्टने दोन मजले चढावे लागू नयेत, म्हणून त्यांची वाहने थेट अॅथलेटिक्सच्या कृत्रिम धावपट्टीवर आणण्यात आली होती. याची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतली असून क्रीडा संकुलाला फटकारले आहे.

रिजाजू म्हणाले,  मला आपल्या देशात खेळ आणि खेळाच्या नैतिकतेबद्दल होणारा असा अनादर पाहून अतिशय वाईट वाटले. आमदार सिद्धार्थ शितोळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या ट्वीटची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री रिजाजू यांनी घेत नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर क्रीडाप्रेमींकडून टीका करण्यात येत आहे.

सिंथेटिक ट्रॅक नक्की कशासाठी वापरायचा असतो. खेळाडूंच्या सरावासाठी की नेत्यांच्या गाड्यांचा ताफा मिरवण्यासाठी असा प्रश्न हे दृश्य बघून सगळ्यांना पडला आहे.  जिथे आंतराराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा भरवल्या जातात आणि  क्रीडापटू सराव करतात त्या सिंथेटिक  ट्रॅकवर जाण्यास एरवी कोणाला परवानगीही नसते . मात्र पुण्यातील म्हाळुंगे – बालवाडीतील क्रीडा सुविधांची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांची वाहनं चक्क या सिंथेटिक ट्रॅकवर नेण्यात आली.  राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संकुलात आमंत्रित केलं  होतं . त्यावेळी घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर त्याबद्दल टीकेची झोड उठल्यावर राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवारांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे गाड्या ट्रॅकवर आणाव्या लागल्या असे कारण क्रीडा मंत्र्यानी दिले आहे.  त्याचबरोबर हा सिंथेटिक ट्रॅक वापरात नसल्याचा आणि लवकरच या ठिकाणी दुसरा सिंथेटिक ट्रॅक बनवण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 म्हाळुंगे – बालेवाडीतील या क्रीडा संकुलात राज्य सरकारने पहिलं  क्रीडा  विद्यापीठ उभारायचं ठरवलंय.  या विद्यापीठाची रचना कशी असावी आणि राज्याचं क्रीडा धोरण कसं असावं याची चर्चा  करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या नेण्याच्या प्रकारामुळं राज्याचं क्रीडा धोरण कोणत्या दिशेने निघालंय असा सवाल विरोधक विचारत आहे.

2008  साली झालेल्या युथ कॉमनवेल्थ गेम्सवेळी पुण्यातील म्हाळुंगे – बालेवाडी क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली . पण त्यानंतर हे क्रीडा संकुल खेळांपेक्षा इथं होणाऱ्या नेत्यांच्या मुलांच्या  आलिशान लग्न समारंभांसाठी आणि राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठीच जास्त चर्चेत राहिलंय . त्यामुळं जोपर्यंत हे नेते त्यांचा साहेबी थाट सोडत नाहीत तोपर्यंत राज्याचे क्रीडा धोरण फक्त कागदावरच राहणार आहे.

Source link

Kiren Rijiju on Twitter : अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्याच्या गाड्या, क्रीडा मंत्री रिजिजू यांनी फटकारले
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News