राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळेच पुण्यातील पत्रकाराचा गेला जीव; ‘त्या’ कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राजीनामा हीच खरी श्रद्धांजली!

0
173

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

Tv9 चे पुण्यातील  पत्रकार पांडुरंग रायकर यांच कोरोनामुळे निधन झाल आहे. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाग्रस्त होते आणि त्यांच्यावर नव्यानेच उद्घाटन करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी आणि पत्रकारांनी त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रुग्णवाहिका मिळू शकली नाही.

सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध आहे,असं सांगण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिका आलीच नाही. त्यांना व्हेंटिलेटरही मिळू शकलं नाही. अखेर पहाटे साडे पाच वाजता त्यांची मृत्युशी झुंज संपली.

दरम्यान, कोरोना काळात नि:स्वार्थी भावनेने सेवा देणारे पत्रकारही सुरक्षित नाहीत. जम्बो कोविड सेंटरचे उद्धाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.

यानंतर राज्य सरकारच्या कुचकामी व्यवस्थेवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील या घटनेवर ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे .

” पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला? हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत! त्या कोव्हिड सेंटरचे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली! ”

असे ट्विट करून प्रशासनाच्या कारभारावर संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here