अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला- चित्रा वाघ

0
28

मुंबई: कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

तर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम होता. भाजपने सभागृहाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. महाविकास आघाडी सरकारने आरक्षण, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार आदी महत्वाच्या मुद्द्यांना बगल देत केवळ वेळ मारून नेण्यासाठी लोकशाहीला कुलूप लावून अधिवेशन केल्याची टीका भाजपने केली होती. पावसाळी अधिवेशन हे अवघ्या दीड दिवसात गुंडाळण्यात आलं असून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे १२-१९ च्या आकड्याचा खेळ वाटतोय यावरूनच कळते की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे? अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही हे विसरलात की जनतेच चिलखत आम्ही परिधान केलंय… माका तुका हा सांगुचा हा..अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय…लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल,’ असं विधान चित्रा वाघ यांनी केलं असून संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.