Monday, June 21, 2021
Homeदेश-विदेशतुमच्या एरियातील कोणत्याही डिस्ट्रिब्यूटरकडून LPG सिलेंडर भरता येणार, पुण्यात सुरू होतेय सुविधा...

तुमच्या एरियातील कोणत्याही डिस्ट्रिब्यूटरकडून LPG सिलेंडर भरता येणार, पुण्यात सुरू होतेय सुविधा | Pune

नवी दिल्ली, 11 जून :  सरकारने एलपीजी रिफिलच्या पोर्टेबिलिटीला (LPG refill portability) मान्यता दिली आहे. आता ग्राहकांना त्यांचे एलपीजी (LPG) सिलिंडर कोणत्याही वितरकाकडून भरता येतील. मात्र, या सेवेचा लाभ ज्या कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, त्या कंपनीच्या इतर वितरकांकडून घेता येईल. मोबाइल अॅप / ग्राहक पोर्टल वरून बुकिंगच्या वेळी संबंधित भागातील सर्व वितरकांची यादी दर्शविली जाईल. आपल्याला ज्यांची सेवा चांगली वाटते, त्यांच्याकडून आपण आपले सिलिंडर (Gas Cylinder) भरून घेऊ शकतो. पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा देशात पुणे, चंदीगड, गुरुग्राम येथून सुरू केली जात आहे. याशिवाय रांची आणि कोयंबटूर येथील ग्राहकांनाही याचा लाभ घेता येऊ शकतो.

तुम्ही अगोदरपासून ज्या वितरकाकडून सिलिंडर घेत आहात, त्याच्या सेवेवर आपण समाधानी नसल्यास आपल्याकडे कंपनी न बदलताही दुसरे पर्याय उपलब्ध असतील. त्याच कंपनीच्या दुसऱ्या वितरकाकडून आपण सिलिंडर घेऊ शकतो. शासन स्तरावर या विषयावर बराच काळ चर्चा सुरू होती, आता एलपीजी रिफिलच्या पोर्टेबिलिटीला (LPG refill portability) मंजुरी मिळाली आहे. आता आपण वितरक न बदलताही इतर वितरकांकडून सिलिंडर भरून घेऊ शकतो.

LPG  ग्राहकांना आपला सिलिंडर कोणत्या वितरकाकडून भरून घ्यायचा आहे, याबाबत पर्याय असणे गरजेचे आहे. आता ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध असल्याने त्यांना त्यांच्या सोयीचा डिलर पाहता येईल, शिवाय एखाद्याची सेवा आवडत नसल्यास गॅस कंपनी न बदलता वितरक बदलता येईल, यातून त्यांची मनमानी कमी होऊन त्यांना चांगली सेवा द्यावी लागेल. ग्राहकांना त्यांच्या पत्त्यावर किती वितरक सेवा देऊ शकतात, याची यादी दिसेल. आपल्या आवडीनं आपण वितरक निवडू शकतो. पथदर्शी प्रकल्प म्हणून चंदीगड, कोयंबटूर, गुरुग्राम, पुणे आणि रांची येथे येथे ही सेवा सुरू होत आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले.


Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW