Monday, June 21, 2021
Homeमनोरंजनमोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा...

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

शासननामा न्यूज ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ‘धक-धक गर्ल’चा किताब तिच्या ग्रेसफुल, मोहक आणि स्टायलिश साडी लुक मिळाला होता; ही बाब खूप कमी जणांना माहिती आहे. सिनेरसिकांमध्ये आजही तिच्या सौंदर्याची क्रेझ पाहायला मिळते. माधुरीला पारंपरिक पोषाख परिधान करणं प्रचंड आवडते. पारंपरिक वेशभूषेमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसते, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

रेशीमच्या धाग्यांपासून डिझाइन केलेली साडी असो किंवा वजनदार पॅटर्नमधील लेहंगा, माधुरी सर्वच प्रकारचे स्टायलिश कपडे अतिशय सहजरित्या कॅरी करते. सोशल मीडिया अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक सुंदर अवतारातील फोटो चाहत्यांना पाहायला मिळत असतात. माधुरी सध्या डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये परीक्षकाची भूमिका निभावत आहे. या शोनिमित्तानं अभिनेत्रीच्या मोहक अदा पाहायला मिळत आहेत.

​माधुरी दीक्षितचा साडीतील मोहक लुक

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

माधुरी दीक्षितचे एकापेक्षा एक आकर्षक लुक सध्या चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. जिकडे-तिकडे तिच्याच रूपाची चर्चा सुरू आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाल रंगाच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. माधुरी दीक्षितनं नेसलेली ही लाल रंगाची साडी सिल्क फॅब्रिक पॅटर्नमधील आहे. मुंबईतील प्रसिद्ध फॅशन डिझाइनर क्षितिज जलोरी यांनी ही साडी डिझाइन केलीय. या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय.

​माधुरीच्या आकर्षक लुकचा ट्रेंड

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

आकर्षक लुक मिळावा यासाठी बहुतांश जणी वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये प्रयोग करत असतात. सध्या स्टायलिश-ग्लॅमरस आणि हॉट दिसण्यासाठी कलर ब्लॉकिंगचाही ट्रेंड जोमात आहे. कलर ब्लॉकिंग पॅटर्न वेस्टर्न आउटफिट्सपर्यंतच नव्हे तर पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायला मिळतंय. मोहक लुक मिळावा यासाठी कित्येक जणी रंगीबेरंगी चोळी आणि ओढणीचा वापर करताहेत. माधुरीने नेसलेली ही लाल रंगाची साडी कलर ब्लॉक्ड फॅशनमधीलच होती. कॉन्ट्रास्टिंग लुकसाठी साडीच्या निऱ्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांचा समावेश करण्यात आलाय.

सिल्कच्या साडीची मोहिनी

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

माधुरीने नेसलेली साडीचे फॅब्रिक प्रचंड मऊ होतं. या साडीमध्ये पूर्णतः सिल्क-सॅटन आणि क्रेप यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचा उपयोग करण्यात आला होता. ही साडी वजनाने अतिशय हलकी आणि चमकदार पॅटर्नमधील होती. ५.५ मीटर लांब आणि ४४ इंच रूंद असलेल्या या प्री-स्टिच्ड साडीमध्ये माधुरी प्रचंड मोहक दिसतेय. अभिनेत्रीनं या साडीवर कटआउट स्लीव्ह्ज टील शेडचे ब्लाउज परिधान केलं होतं. हॉल्टर नेकलाइनमुळे संपूर्ण लुक परफेक्ट दिसतोय.

​माधुरी दीक्षितचा परफेक्ट लुक

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

मल्टीशेड असणाऱ्या या साडीवर माधुरीने ‘Amrapali Jewels’ने डिझाइन केलेले डायमंड-एम्रल्ड आणि पर्लपासून तयार करण्यात आलेले नेकलेस व ईअररिंग्स घातले होते. मेसी बन हेअरस्टाइल आणि लाइट टोन मेकअपमध्ये तिला आकर्षक लुक मिळाला आहे. मेकअपसाठी तिनं चमचमणारे आयशॅडो, बेसिक आयलाइनर, लाइट टोन लिपस्टिक, बीमिंग हाइलाइटर या ब्युटी प्रोडक्टचा उपयोग केला होता.

​साडीची किती होती किंमत?

मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’

ऑफिस पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी या पॅटर्नमधील साडी नेसणं परफेक्ट निवड ठरू शकते. ही साडी सुंदर व वजनाने अतिशय हलकी आहे, यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल लुक मिळू शकतो. एवढंच नव्हे तर सिल्क पॅटर्न साडीवर जास्त प्रमाणात ज्वेलरी परिधान करण्याचीही आवश्यकता नाही. हवे असल्यास आपण एखादे नाजूक नेकलेस साडीवर घालू शकता. ही साडी तुम्हाला आवडली असल्यास एकूण २४ हजार ८०० रूपये खर्च करावे लागतील.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW