Mahad : पूर येऊन सहा महिने उलटले; तरीही प्रशासनाकडून पूर निवारण कार्यवाही अपूर्णच!

0
23

रायगड : महाडमध्ये जुलै महिन्यात आलेल्या महापुराने महाडकरांची चांगलीच दाणादाण उडवली. त्यानंतर महाड (Mahad) मध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या गेल्या. मात्र, महापुराला (Floods) सहा महिने उलटले, पुढचा पावसाळा तोंडावर आला तरीदेखील महापुरास कारणीभुत ठरलेला महाडच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम अपेक्षीत प्रमाणात पुर्ण झालेले नाही. 

महाड तालुक्यातील नद्यांमधील (Rivers) गाळ आणि जुटे काढण्याचे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी महाड पुरनिवारण समिती आक्रमक झाली आहे. समितीने उद्या 4 फेब्रुवारी रोजी महाड शहरामध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. प्रशासनाचा निषेध करीत काढल्या जाणाऱ्या मोर्चाचा शेवट महाड प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाने (Agitation) केला जाणार आहे.  शासन आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाहीतर रस्ता रोको सारख्ये उग्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.

Facebook Notice for EU! You need to login to view and post FB Comments!