Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रmaharashtra assembly monsoon session 2021: Live Update: अधिवेशनाचा दुसरा दिवस; आमदारांच्या निलंबनामुळं...

maharashtra assembly monsoon session 2021: Live Update: अधिवेशनाचा दुसरा दिवस; आमदारांच्या निलंबनामुळं विरोधक काय भूमिका घेणार? – live updates: 2nd day of maharashtra assembly monsoon session 2021


मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याचे पडसाद सभागृहात उमटले होते. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विधान परिषदेच्या सभागृहातही विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाची मागणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे दिवसभरात आरक्षणासाठी सहा वेळा; तर सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणखी दोनदा कामकाज तहकूब करावे लागले.

अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची चर्चा आहे. तर, सत्ताधारी पक्ष वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याकडे लक्ष असणार आहे.

– अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

– १२ आमदारांच्या निलंबनामुळं भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलनाचा इशारा

– केंद्र सरकारने महिन्याला तीन कोटी लस उपलब्ध करुन द्या; सत्ताधारी पक्ष आज ठराव आणणार

– विधिमंडळात कृषी कायद्याबाबत ठाराव मांडणार असण्याची शक्यता

– वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करणार

– १२ आमदारांच्या निलंबनाचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता



Source link

maharashtra assembly monsoon session 2021: Live Update: अधिवेशनाचा दुसरा दिवस; आमदारांच्या निलंबनामुळं विरोधक काय भूमिका घेणार? - live updates: 2nd day of maharashtra assembly monsoon session 2021
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News