ओबीसी आंदोलनात आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची एंट्री; परभणीतून केली घोषणा – parbhani shiv sena leader sanjay rathod entry in obc agitation updates

0
90


हायलाइट्स:

  • ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
  • शिवसेनेचे संजय राठोडही आंदोलनात होणार सहभागी
  • परभणीतील दौऱ्यात केली घोषणा

परभणी : राज्यात सध्या विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आरक्षण पुन्हा मिळावं यासाठी मराठा समाज आग्रही आहे. तसंच राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजही (OBC Reservation) आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीसह भाजपमधील ओबीसी नेतेही टोकदारपणे आपली भूमिका मांडत आहेत. अशातच आणखी एका ओबीसी नेत्याने या आंदोलनात उडी घेतली असून याबाबतची घोषणा केली आहे.

देशपातळीवर बंजारा समाजाची ओळख ओबीसी म्हणूनच आहे, असं सांगत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी ओबीसी आंदोलनात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. ते परभणी येथे दौऱ्यावर असताना सावली या विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

राठोड हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर राज्यातील बंजारा समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि सध्या ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय पाठिंबा दर्शविन्यासंबंधी ते दौऱ्यातून समाजातील विविध घटकांशी चर्चा करत आहेत.

‘ओबीसी बांधवांवर अन्याय’

राज्यात आम्हीही ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे सांगून ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे पदोन्नती, भरती प्रक्रिया, आदी बाबत तमाम ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे. हाच अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने ओबीसी आंदोलनात सहभागी होणार आहोत. आमची क्रिमिलियरची मागणी ही जुनीच आहे. स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून विमुक्त भटक्या जमातींना मुक्त केले होते आणि क्रिमिलियरची अट लागणार असे जाहीर केले होते. पण आता जाचक क्रिमिलियरची अट लावण्यात आलेली आहे. त्यामुळे बंजारा समाजासह सर्व ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी तमाम ओबीसी समाजाने जागृत होऊन एक व्हावं, असं आवाहन संजय राठोड यांनी केलं आहे.

‘समाजाचे सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार, राज्यमंत्री असताना प्रयत्न केला. तसेच तांडा वस्त्यांना महसुली दर्जा भेटावा, स्वंतत्र्य ग्रामपंचायतीचा दर्जा भेटावा, महसूल राज्यमंत्री असताना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित केले होते की सर्व तांड्यावस्त्याची माहिती देण्यात यावी. माझा लढा समाज बांधवांसाठी मंत्रिपद असो की नसो पण सतत सुरू असेल,’ असंही ते म्हणाले.

या बैठकीसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात बंजारा समाज उपस्थित होता. या बैठकीत बंजारा समाजबांधवांनी वस्त्या तांड्याच्या व्यथा मोठ्या प्रमाणात मांडल्या. यावेळी सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकात राठोड यांच्यासह साधनाताई राठोड, सविता चव्हाण, कमलबाई चव्हाण, लक्ष्मीबाई आढे, बंशी राठोड, खरुडे ताई, भागवत चव्हाण, संदीप राठोड, सुधीर राठोड, रामदास आढे, भागवत चव्हाण आदींची उपस्थिती होती.



Source link