पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
दिनांक १३/१२/२०१२ रोजी रात्री २२.३० चा ते २३.०० या चे दरम्यान दुगड शाळेजवळ, सच्चाईमाता परीसर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे प्रकाश निवृत्ती रेणुसे, वय २७ वर्षे, रा. अटल १२. कांबळे चाळ, दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने व दगडांनी मारहाण केली असल्यामुळे त्यास ससुन हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी अॅडमीट केले असता तो दिनांक १२ / १२ / २०२२ रोजी ससून हॉस्पीटल येथे मयत झाला आहे म्हणुन अनिल प्रल्हाद भोसले, पोलीस हवालदार २२३० भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे यांनी सरकारतर्फे तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४३/२०२२. भादंवि कलम ३०२.३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाहीजे आरोपी १. दत्ता राहुल कदम, २. अजय सदाशिव रेणुसे हे फरार होते. त्यांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना आरोपी दत्ता राहुल कदम, अजय सदाशिव रेणुसे है जुना कात्रज बोगद्याजवळ थांबले असुन ते त्यांचे नातेवाईकांना भेटुन पुन्हा तेथुन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज बोगद्याजवळ गेले असता तेथे आरोपी १. दत्ता राहुल कदम, वय २२ वर्षे, रा. साईलिला अपार्टमेंन्ट, साई मंदीराजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे २. अजय सदाशिव रेणुसे, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदीराजवळ, अटल १०, आंबेगाव खुर्द, पुणे हे मिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक ३०/०१/२०२३ रोजी १८.३० या अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सौ. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुमार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरगोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.