[ad_1]
हायलाइट्स:
- दहावीतील मुलीला फुस लावून पळवलं
- मुंबईतील खारघर परिसरातून आरोपीला अटक
- पोलिसांनी दाखल केला बलात्काराचा गुन्हा
या प्रकरणात सरकारी वकिल अजित देशमुख यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. अकोट येथील अल्पवयीन मुलीच्या आईने अकोट शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार , आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मंगेश याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. या तक्रारीवरुन अकोटचे ठाणेदार संतोष महल्ले तथा पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे यांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी मंगेश जोगदंड आणि अल्पवयीन मुलीस मुंबईतील खारघर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीला १७ जून २०२१ रोजी अकोट पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. तसंच अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे .
तपास अधिकारी अनुराधा पाटेखेडे यांनी पीडितेचे जबाब तिच्या आईसमक्ष घेतला असता, पीडितेने सांगितले की, आरोपीने चार ते पाच वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या आरोपामुळे मंगेश जोगदंड याची वैद्यकीय तपासणी तसंच या प्रकरणात आरोपीची सविस्तर चौकशी करण्याकरता २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला पटवून दिले गेले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची सरकारी वकील यांची विनंती मान्य करत न्यायलयाने आरोपीची २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
[ad_2]
Source link