Home महाराष्ट्र नाशिकमध्ये नवी नियमावली; सोमवारपासून काय सुरू…काय बंद? जाणून घ्या – new rules for unlock process in nashik latest updates

नाशिकमध्ये नवी नियमावली; सोमवारपासून काय सुरू…काय बंद? जाणून घ्या – new rules for unlock process in nashik latest updates

0

[ad_1]

हायलाइट्स:

  • नाशिककरांचं जनजीवन पूर्वपदावर येणार
  • क्रीडांगणे, पटांगणे, उद्यानांवरील निर्बंधांमध्ये सूट
  • शहरासाठी नवी नियमावली जाहीर

नाशिक : राज्यातील अनलॉकच्या तिसऱ्या श्रेणीत नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील संपूर्णपणे निर्बंध हटवण्यात आले नसले तरी बऱ्याच प्रमाणात नाशिक आता अनलॉक होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जिल्ह्याचा ऑनलाईन आढावा घेतला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या पाहून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे . त्या अंतर्गत विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

सकाळी सात वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोमवार ७ जूनपासून शहरात नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नाशिकमध्ये काय आहेत नवे नियम?

– लग्नसमारंभ ५० नातलगांच्या उपस्थितीत करता येणार आहे.

– अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

– क्रीडांगणे, पटांगणे, उद्याने विशिष्ट वेळेसाठी सुरु होणार आहेत.

-हॉटेलिंग ४ वाजेपर्यत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.

महाराष्ट्र कसा होणार अनलॉक?

करोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील, याचा विचार करता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत.

या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील.. त्या त्या ठिकाणाचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here