Home महाराष्ट्र कोकण प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी

प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी

0

रत्नागिरी- अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्‍यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्‍यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी चिपळूण शहरातील व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here