मुंबई (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
मुंबई हे बेटांचं शहर त्यावर इंग्रज पोचले खरे परंतु महाराष्ट्राच्या पुणे व इतर भागात दळणवळण साठी अडकून पडले असताना या भागात असलेल्या मेंढपाळ बांधवांनी त्याना रस्ता दाखवला हाच तो मुंबई-पुणे रस्ता जिथून आज लोकांची वहिवाट आहे . शिंगरोबा धनगर यांनी केलेलं हे महान कार्य परंतु त्यांना त्यासाठी बलिदान द्यावं लागल या हुतात्म्यांच्या मंदिर जवळ महावितरनाच्या लाईटचे काम भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे अडकून पडलं होतं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीतून आणि भाजपा विमुक्त-भटके कार्यकर्त्यांच्या मागणी पुढाकारातून हे काम आज पूर्णत्वास केले व त्याबद्दल बहुजन वर्गाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत त्यांनी आमच्या सामाजिक लढ्यास न्याय देऊन शिंगरोबा मंदिर परिसर कायमचा उजळला.
बोरघाट (खोपोली), तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे “वीर हुतात्मा शिंग्रोबा” प्रसिद्ध मंदिर आहे. धनगर समाज, विमुक्त-भटके समाजाचे व महराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. सदर ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. तेथे दरवर्षी १ मे रोजी मोठा भव्य उत्सव साजरा होतो.
सदर मंदिरास विद्युत पुरवठा नसल्याने भेट देणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणत गैर सोय होत होती, त्या अनुषंगाने १ KW वीज जोडणी मिळण्यासाठी राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व विश्वास पाठक संचालक महावितरण यांना विमुक्त-भटके आघाडीचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर व विमुक्त-भटके आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस संघटन अशोक चोरमले, सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, कोकण विभागाचे सहसंयोजक भास्कर यमगर, कोकण विभाग युवा अध्यक्ष उमेश पाटील, सुहासिनीताई केकाने, बबनराव बारगजे, विद्याताई तामखेड, ईश्वर गोरे यांनी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक २१ जानेवारी २०२३ लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने आज जोडणी झालेले आहे.
महावितरण संचालक संचलन संजय ताकसांडे, महावितरण कार्यकारी अभियंता रायगड ग्रामीण शिवाजी वौयफालकर व उपअभियंता व महावितरणच्या कर्मचारी वृंद यांचे भटके विमुक्त आघाडी तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.