Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र शिवसेना उज्ज्वल निकम यांच्या माध्यमांतून आपली सुधारण्यासाठी प्रयत्नशील?

शिवसेना उज्ज्वल निकम यांच्या माध्यमांतून आपली सुधारण्यासाठी प्रयत्नशील?

0

मुंबई : राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेला आता आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या दीड वर्षांच्या कालखंडातच शिवसेनेची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. त्यातुन पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चांसाठी कारणीभूत ठरली आहे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट

शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जळगाव दौऱ्याच्या दरम्यान उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे. शनिवार १० जुलै रोजी ही भेट झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या भेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या आधी गेल्या महिन्यात शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटींच्या सिलसिल्यामुळे उज्वल निकम यांना पक्षात सामील होण्यासाठी शिवसेना फिल्डिंग लावत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी शिवसेनेने युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नवा घरोबा केला तेव्हापासूनच राज्यातील जनमत शिवसेनेच्या विरोधात तयार होताना दिसत आहे. त्यात कोविड नियोजनाच्या बाबतीतही सरकारने ढिसाळ कारभाराचे प्रदर्शन केले. हे कमी की काय म्हणून शिवसेनेशी संबंधित सचिन वाझे, प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक झाली. तर शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावरही वसुलीचे आरोप झाले आहेत. या प्रकरणांमध्ये शिवसेनेची प्रतिमा राज्यात फारच लयाला गेली आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने उज्वल निकम यांचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच शिवसेना प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पण उज्ज्वल निकम आणि शिवसेना अशा दोन्ही बाजूंनी भेटीच्या वृत्ताचे खंडन केले नसेल तारीही राजकारणात येण्याच्या चर्चांना मात्र विराम दिला आहे. आपण कुठल्याही पक्षात सहभागी होत नसल्याचे उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here