Home महाराष्ट्र Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर आणि ईडीची छापेमारी

Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर आणि ईडीची छापेमारी

0
Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर आणि ईडीची छापेमारी

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. पहाटे साडे सहा वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारल्याचं वृत्त येताच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 158 कोटी रुपयांचे पुरावे दिले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उद्धव ठाकरे यांची तर प्रचंड मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणं एवढंच या सरकारचं काम होतं, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं. त्याची चौकशी सुरू झाली आहे. हिसाब तर घेऊनच राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारावर चर्चा केल्याचं सांगण्यात येतं. या भेटीनंतर लगेचच आज मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज पहाटे 6.30 वाजता ईडी आणि आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील निवासस्थानी येऊन छापेमारी सुरू केली. मुश्रीफ यांच्या घरात छाननी सुरू आहे. महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घरातून कुणालाही बाहेर पडू दिले जात नाही. तसेच बाहेरच्या लोकांना घरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ही कारवाई किती वेळ चालणार याची काहीच माहिती देण्यात येत नाही. मात्र, ही कारवाई उशिरापर्यंत चालणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुश्रीफ यांच्या फक्त घरीच ही छापेमारी सुरू राहणार की इतर ठिकाणीही छापेमारी होणार याबाबतचीही काहीच माहिती मिळताना दिसत नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here