Home महाराष्ट्र पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

1
पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

बुलडाणा: (प्रतिनिधी)| शासननामा न्यूज ऑनलाईन

उपोषणाला बसलेल्या बाप लेकिचे उपोषण उधळून त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या उपोषणकर्त्याच्या भावाने केला आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना बुलडाण्याच्या अमडापूर येथे घडली आहे.

चिखली तालुक्यातील अमडापूर येथील शाम राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी पोलिसांकडे विचारपूस केली. मात्र त्यांना पोलीस ठाण्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने त्याची तक्रार त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली. त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शाम राऊत व त्यांची मुलगी मयुरी या बाप लेकीने काल अमडापुर येथे उपोषण सुरू केले होते.



रात्रीच्या सुमारास पोलिसांनी दमदाटी करून हे उपोषण उधळून लावले आणि शाम राऊत यांना ठाणेदारासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासह कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असा आरोप त्यांचा भाऊ गजानन राऊत यांनी केला आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या शाम राऊत यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती गजानन राऊत यांनी दिली आहे.



तर, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करून शाम राऊत यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचे बिट बदलण्यात आले आहे. या आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात जे दोषी आढळलतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे.



दरम्यान, ठाणेदार अमित वानखेडे यांच्या काही घरगुती अडचणी असल्याने त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज दिला होता. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच अमडापूर ठाणेदार प्रभारी पदाचा पदभार एलसीबीचे एपीआय नागेश चतरकर यांना देण्यात आला असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Source link

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here