मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करतात, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर ते बोलत होते. आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा संपूर्ण खर्च जपान सरकारने उचलला होता, कारण त्यांना जपान सरकारने अधिकृत पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यावर त्यांचा खर्च जपान सरकार उचलते. सोबत आलेल्या अधिकाऱ्यांचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलला आहे. जपान दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक केली याची संपूर्ण टाइमलाइन त्यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्यांच्या भेटीतून मोठी गुंतवणूक झाली आहे. जर तुम्ही ते वाचले नसेल तर पुन्हा वाचा.
बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !’ असे ट्वीट करत शेलारांनी म्हटले.