मुंबई (संपादक: सोमनाथ देवकाते) । शासननामा न्यूज ऑनलाईन
केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील धनगर समाजाला डावलले गेल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजात असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत क्रमांक दोन वर असलेला धनगर समाज राजकारणात मात्र वंचित राहावे लागत असल्याची भावना धनगर समाजाच्या राज्यभरातून आलेल्या धनगर संघर्ष समिती च्या पदाधिकारी व काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काल प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब शिंदे आणि ओबीसी नेते प्रा.कपिल दहेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून धनगर संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.
या वेळी खासदार विकास महात्में यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शांत करत मी कुठलीही मागणी केली नसताना मला भारतीय जनता पक्षाने राज्यसभेचे खासदार केले भाजप शिवसेना युतीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात शासनाला धनगर समाजाच्या बाजुने शप्पथ पत्र देण्यासाठी भाग पाडले, कोट्यवधी रुपयांची अहिल्यादेवी होळकर सभागृहाची उभारणी केली धनगर समाजाच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आजपर्यंत च्या इतिहासात कधीच केली नाही अशी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी भाग पाडले व तसे आदेश निर्गमित करण्यात आले मेंढपाळाचे प्रश्न, समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी जागेचे प्रश्न ,घरकुल प्रश्न अशा अनेक योजना मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाने त्या साठी मोलाची मदत केली मला मंत्री पद दिले नाही म्हणून अंदोलन करण्यापेक्षा धनगर समाजाला देण्यात आलेल्या एक हजार कोटी मिळवण्यासाठी अंदोलन करा राज्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे त्यासाठी अंदोलन करा.
राज्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे त्यासाठी अंदोलन करा माझ्या पेक्षा माझा कार्यकर्ता आणि समाज मोठा झाला पाहिजे माझा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीचा आहे. धनगर आरक्षण प्रश्नावर लवकरच दिल्लीत एक बैठक घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या कानावर हा विषय घालणार असल्याचे खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी राज्यभरातून आलेल्या धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबंधीत करतांना सांगितले.
आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.