मुंबई : शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना व महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांसमोर मारहाण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेचा भाजपने निषेध केलाय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी, “लपून छापून हल्ले कसले करताय; रणांगणात येऊन लढा ही भाजप तुम्हाला चारी मुंड्या चीत करेल.भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करून शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली! “, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.
शेलार यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, युवा मोर्चाचे आमचे अधिकारी पोलिसांना सांगून करत होते. लपून छापून पोलिसांच्या आड राहून महिलांवर हल्ले करून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली आहे. जयावेळेला सोनिया वांद्रा या आपल्या देव बनतात तेव्हा तेंडुलकर, साठे आणि आंबेरकर हे शिवसेनेचे दुश्मन बनतात. पून छापून हल्ले कसले करताय; रणांगणात येऊन लढा ही भाजप तुम्हाला चारी मुंड्या चीत करेल.भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करून शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. एक महिला अक्षता तेंडुलकर हिला शिवसैनिकांनी घेरले आणि मारहाण केली. याचा आम्ही निषेध करतो.”, असे म्हणत आशिष शेलार यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला.
शिवसेना भवनासमोर झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल असून, शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर राजकारण तापू लागले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.