[ad_1]
हायलाइट्स:
- पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी
- सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घडलेल्या घटनेचा तपशील सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असं सांगातानाच विरोधी आमदारांनी शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे. ‘ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठराव संमत करत असताना व्यासपीठावर काही सदस्य आले आणि त्यांनी माझा माईक ओढण्याचा व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच मी सभागृहाची परिस्थिती पाहून कामकाज स्थगित केलं,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. सभागृहाचं कामकाज तहबूक झाल्यानंतर काही सदस्य अध्यक्षांच्या दालनात आले व मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप करतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
भाजपला झटका! सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ आमदार निलंबित
‘सभागृहातील गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधक-सत्ताधारी तोडगा काढतात. मी अध्यक्ष्यांच्या दालनात बसलो होतो त्यावेळीस देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील आले त्यांना बसण्यासाठी मी खुर्चीही दिली होती. पण मी बोलायची संधी न दिल्यामुळं ते रागावले होते,’ याकडेही भास्कर जाधव यांनी लक्ष वेधलं आहे.
‘विरोधकांचा गोंधळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर धावून आले. तेव्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करु असं म्हटलं पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं उत्तर विरोधी पक्षनेत्यांनी दिलं. त्यावेळेस तुम्हाला राग आहे तर मग भास्कर जाधवला राग कमी आहे काय?, असे मी फडणवीसांना बोलले. तुम्ही सर्व असाल तर मी एकटा आहे,’ असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
वाचाः … तर पुन्हा मूक आंदोलन करणार; संभाजीराजेंचा सरकारला थेट इशारा
‘ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाचा योग्य निर्णय व्हायला हवा होता. जर मी चूक केली असेल तर मी पण शिक्षेला तयार आहे. मी एकही असंसदीय शब्द वापरला नाही,’ असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत खडाजंगी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा
[ad_2]
Source link