मुंबई : शिवसेनचे आमदार भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या महिलेला अरेरावीची भाषा वापरली. यावरुन विरोधक आणि सोशल मीडियातून जाधव यांच्यावर टीका होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार ashish shelar यांनी आज भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. (Bhaskar Jadhav’s’ that ‘behavior’ to please the owner…)
आशिष शेलार म्हणाले, ”भास्कर जाधव यांनी यापूर्वीही विधानसभेत गैरवर्तन केलं आहे. काल त्यांनी पुरग्रस्तांसोबत गैरवर्तन केलं आहे. ते आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असं करीत असतात.” शेलार पत्रकारांशी बोलत होते.
चिपळूणमध्ये मदतीची विनवणी करणाऱ्या एका महिलेल्या भास्कर जाधव यांनी दिलेल्या उत्तरावरून वाद निर्माण झाला. भास्कर जाधव यांची बोलण्याची पद्धत चुकल्याचं सांगत सोशल मीडियावर अनेक तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपाकडूनही यावर टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार म्हणाले,”भास्कर जाधव यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतच गैरवर्तन केलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गैरवर्तन केलं होतं. त्या गैरवर्तनाचा जाहीर कार्यक्रम त्यांनी आज जनतेसमोर ठेवला. हे होणारच होतं. ज्यांना जनतेच्या नाळेपेक्षा स्वःपक्षाची नाळ मोठी वाटते. आपल्या मालकाला खुश करण्यासाठी जनतेला लाथ मारावी असं वाटतं. तेच लोक भास्कर जाधव सारखं करतात”, अशी टीका शेलार यांनी केली.