Home महाराष्ट्र ‘मुंबईचा ध्यास घेतलेल्यांनी मुंबईकरांना काय दिलं?’

‘मुंबईचा ध्यास घेतलेल्यांनी मुंबईकरांना काय दिलं?’

0
‘मुंबईचा ध्यास घेतलेल्यांनी मुंबईकरांना काय दिलं?’

मुंबईः मुंबईत मान्सून दाखल होताचं पावसानं शहर व उपनगराला झोडपून काढलं आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मुसळधार पावसामुळं अनेक इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळं नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसंच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

‘नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पण त्यांनी मुंबईच्या विकासात भरीव योगदान केलं. गडकरींनी मुंबईत ५६ पूल बांधले. फडणवीसांनी मेट्रोचं जाळे विणले. याउलट मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसंच, दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे, अनधिकृत बांधकाम व ते पडल्यानं जाणारे जीव,’ असंही उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मालाड मालवणीमधील तीन मजली बेकायदा इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या गुरुवारच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील इमारती कोसळण्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी स्वयंप्रेरणेने (सुओ मोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here