[ad_1]
हायलाइट्स:
- भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
- दिवाळीपर्यंत पाईपलाइन योजनेचे उपलब्ध करुन दिल्यास भाजप सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना पाच नद्यांचे पाणी आणून अभ्यंगस्नान घालू- भाजप.
- कोल्हापूर थेट पाईपलाइन योजनेचे काम गेले सहा वर्षे सुरू आहे.
पुढील वर्षी दिवाळीपर्यंत जरी थेट पाईपलाइन योजनेचे पाणी कोल्हापूरकरांना उपलब्ध करुन दिलात तर भारतीय जनता पक्षातर्फे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ या मंत्र्यांना पाच नद्यांचे पाणी आणून अभ्यंगस्नान घालू’असा पलटवार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. (bjp leaders criticize guardian minister satej patil and rural development minister hasan mushrif)
कोल्हापूर थेट पाईपलाइन योजनेचे काम गेले सहा वर्षे सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही मंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी दिली. पुढील वर्षी या पाण्यानेच कोल्हापूरकर अभ्यंगस्नान करतील असा शब्द मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी दोन्ही मंत्र्यांच्या आश्वासनाला प्रत्यूत्तर दिले.
जाधव म्हणाले, ‘जिल्ह्यातील हे दोन्ही मंत्री काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेवरुन नागरिकांची दिशाभूल करत आहेत. योजनेचे ५० टक्केही काम झाले नसताना ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे खोटे सांगत आहेत. हिम्मत असेल तर महापालिकेने पाईपलाइन योजनेविषयी श्वेतपत्रिका प्रसिद्ध
करावी, वस्तुस्थिती नागरिकांसमोर येईल’.
क्लिक करा आणि वाचा- 55th foundation day of shiv sena शिवसेना वर्धापन दिन Live: ‘लोक चिंतेत असताना स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील’
ते म्हणाले, ‘दोन्ही मंत्र्यांकडून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. प्रत्येकजण वेगवेगळी तारीख जाहीर करत आहे. जानेवारी आणि मे २०२२ ही दोन्ही महिने राहू देत पुढील वर्षी दिवाळीपर्यंत थेट पाइपलाइन योजनेचे पाणी उपलब्ध झाले तर मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांना पाच नद्यांचे पाणी आणून अभ्यंगस्नान घालू.’
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवप्रसाद सामनाच्या कार्यालयात पाठवू का?’; नितेश राणेंचा राऊतांना टोला
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘पाईपलाइन योजना रखडणे हे दोन्ही मंत्र्यांचे अपयश आहे. मात्र हे मंत्री महोदय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोष देत आहेत. अपशय आले की दुसऱ्यांवर खापर फोडायचे ही त्यांची निती आहे. भविष्यात ते महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीला बळीचा बकरा करतील.’
क्लिक करा आणि वाचा- ‘राहुल गांधी हे देशाचे प्रमुख नेते’; संजय राऊत यांनी वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘मुळात दोन्ही मंत्र्यांनी, सगळ्या परवानग्या नसताना श्रेयवादासाठी पाईपलाइन योजनेच्या कामाचे उद्घाटन केले. केवळ पाईपलाइन टाकणे म्हणजे योजना पूर्ण झाली असे नव्हे. जॅकवेलसह अन्य महत्वाची कामे शिल्लक आहेत. सभागृहात वारंवार हा विषय उपस्थित केला होता. सध्या या योजनेचे ५० टक्के काम झाले नसताना ८० टक्के काम झाल्याचे सांगितले जाते. महापालिकेने या योजनेविषयी श्वेतपत्रिका काढावी.’
[ad_2]
Source link