Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ‘अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ते पत्र चोरले’

‘अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ते पत्र चोरले’

0
‘अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ते पत्र चोरले’

पुणे : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा हल्लाबोलही चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून अजित पवारांवर निशाणा साधला. या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नाट्यमयरित्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जात राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे, असं अजित पवारांनी तेव्हा आम्हाला सांगितल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

‘अजित दादांनी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यात दांभिकपणा आहे,’ असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो,’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसंच आम्ही भाजपचा झेंडा न घेता आंदोलनात सहभागी होऊ, कारण पक्षाचा झेंडा घेऊन आंदोलनात उतरलो तर त्याला राजकीय रंग येईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here