Home महाराष्ट्र धक्कादायक…भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मराठी असल्याने मुंबईत घर नाकारलं होत, जाणून घ्या सविस्तर बातमी

धक्कादायक…भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मराठी असल्याने मुंबईत घर नाकारलं होत, जाणून घ्या सविस्तर बातमी

0
धक्कादायक…भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मराठी असल्याने मुंबईत घर नाकारलं होत, जाणून घ्या सविस्तर बातमी

मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

मुलुंडमध्ये एका मुलीला केवळ ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे मराठी लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सर्व सामान्य जनतेमधून या प्रकारावर राग व्यक्त केली जात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी तर त्यांनाही हा अनुभव आल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आपल्याबाबतीत कधी घडला याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

आज एका मराठी मुलीची मी व्यथा पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादात मला पडायला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवादावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावे ठेवावी यात मी फार उडी घेत नाही. परंतु, एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती, इथे मराठी माणसाला घर देत नाही, किंवा मराठी माणसाला सोसायटीत राहण्याची परवानगी नाही. हे धक्कादायक आहे. या मुलीसोबत जो प्रकार झाला. तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

जेव्हा मला सरकारी घर सोडून नवं घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला. मराठी लोकांना आम्ही घर देत नाही, असं सांगितलं गेलं, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. मी कोणत्याही एका भाषेची किंवा एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, जातीने आणि धर्माने नटलेलं आहे. मुंबई ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here