मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते. काल भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला’ सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. (BJP Nitesh Rane Criticism CM Uddhav Thackeray)
या घटनेवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. कालच्या राड्यावर नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना.. तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
भाजपच्या मुबईतील कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी कौतुक केलं आहे. भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी त्यांचे कैातुक केलं आहे.
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल मुंबईत झालेल्या संघर्षाने या दोन पक्षांतील अंतर आणखी वाढले असून राम मंदिर जमिनीसाठी झालेल्या कथित गैरव्यवहरावरून ‘सामना’ ने टीका केल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी गेले. मात्र तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून दोन्ही पक्षांतील नेतेही सोशल मिडियात भिडले आहेत.
भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते काल मोठ्या संख्येने मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सुरु धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना भवनासमोर हा प्रकार सुरू असताना परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळनंतर या परिसरातील गर्दी कमी झाली असली, तरी वातावरण तंग होते. तसेच या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.